…म्हणून ताकही फुंकून पितोय; प्रस्ताव आल्यास… मनसे नेत्यांनी युतीबाबत थेट सांगितलं

Sandeep Deshpande यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जर उबाठाकडून युतीचा प्रस्ताव आला.

Letsupp Marathi (9)

Letsupp Marathi (9)

Sandeep Deshpande on Raj and Udhhav Thackeray Yuti : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली जाऊ शकते. अशा अर्थाचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा पासून माध्यमं आणि राजकीय वर्तुळात हीच चर्चा सुरू आहे. त्यावर आता मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जर उबाठाकडून युतीचा प्रस्ताव आला. म्हणजे ते एक पाऊल पुढं आले तर साहेब 10 पाऊलं येतील. तसेच आमचं तोंड दुधाने पोळलंय म्हणून ताकही फुकुंन पितोय. असं म्हणत युतीचा प्रस्तावच आला नसल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार; मनसे अन् शिवसेना युतीवर उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले?

यावेळी बोलताना संदिप देशपांडे म्हणाले की, उबाठा सोबत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संघनांच्या निवडणुकांमध्ये युती करायची की, नाही. हे राज ठाकरे ठरवतील मात्र आमचं तोंड दुधाने पोळलंय म्हणून ताकही फुकुंन पितोय. त्यामुळे जो पर्यंत कोणताही प्रस्ताव राज ठाकरेंपर्यंत येणार नाही. तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोहचू शकत नाही.

अखेर अभिजीत सावंतच्या नव्या लूक मागचं कारण समोर! चाल तुरु-तुरु नंतर करणार ‘हे’ नवं गाणं

कारण या अगोदर 2014 आणि 2017 या दोन्ही वेळचा आमचा अनुभव वाईट आहे. त्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी नांदगावकरांना साधी भेट देखील दिली नव्हती. मात्र सध्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जरी माध्यमांमधून युतीवर बोलत असले तरी त्यांनी अशा प्रकारे कोणताही औपचारिक प्रस्ताव ठेवलेला नाही. असं म्हणत मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा गौरव; ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कारा ने सन्मानित

दुसरीकडे महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (Thackeray) त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.

Exit mobile version