Download App

सांगलीत बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर कारवाई होणार? नाना पटोले म्हणाले…

विशाल पाटील यांच्या बंडानंतर काँग्रेसने अहवाल तयार केला. हा अहवाल हायकमांडला पाठवला आहे.

  • Written By: Last Updated:

Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभेची जागा (Sangli Lok Sabha) जागा ठाकरे गटाकडे गेली. त्यानंतर नाराज असलेल्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, बंडखोर विशाल पाटलांवर (Vishal Patil) कारवाईची मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यावर आता कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाष्य केलं.

काल कोल्हापूरचे बंडखोर नेते बाजीराव खाडे यांना काँग्रेस पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. मात्र, विशाल पाटील यांच्यावर तातडीने कारवाई होत नसल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होते. दरम्यान, आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसच्या बैठकीसाठी सांगलीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. विशाप पाटलांवरील कारवाईचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केले.

विशाप पाटील यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता पटोले म्हणाले, विशाल पाटील यांच्या बंडानंतर काँग्रेसने अहवाल तयार केला. हा अहवाल हायकमांडला पाठवला आहे. या अहवालाच्या आधारे हायकमांड विशाल पाटील यांच्याबाबत निर्णय घेईल, असे नाना पटोले म्हणाले.

कॉंग्रेस चंद्रहार पाटलांसोबतच
सांगलीतील बोलताना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची कबुली दिली. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासोबत असेल असंही जाहीर केलं.

मतविभाजन होण्याची शक्यता
विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल केला. त्यामुळं विशाल पाटील, चंद्रहार पाटील यांच्यात होणाऱ्या मतविभाजनचा फायदा भाजपच्या संजय काकांना होऊ शकतो. त्यामुळं कॉंग्रेसकने ठाकरे गटाला एक ऑफर दिली होती. सांगलीऐवजी उत्तर मुंबईची जागा घ्या, असा प्रस्ताव कॉंग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर ठेवला होता. मात्र, ठाकरे गटाने हा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा आहे. त्यामुळं सांगलीतून चंद्रहार पाटीलच लढणार असल्याचं स्पष्ट झालं.

follow us

वेब स्टोरीज