Election program for 5 seats of Legislative Council : राज्यात विधानसभा निवडणुक पार पडल्या. त्यानंतर आता रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर (Election program) झाला आहे. या निवडणुकीसाठी 10 ते 17 मार्च या दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असुन 27 मार्च रोजी विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आता राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी दोन नावे सध्या चांगली चर्चेत आहे, ती म्हणजे झिशान सिद्धकी व दुसरे नाव म्हणजे संग्राम कोते (Sangram Kote) होय. युवकांमध्ये चांगला जनसंपर्क असलेलं कोते हे राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही अजित पवारांसोबत कायम राहिले व पक्ष बळकटीकरणसाठी झटत राहिले. यामुळे याची जाणीव ठेवत दादा त्यांच्या पारड्यात विधानपरिषदेचे झुकत माप टाकणार की त्यांना डावलण्यात येणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार (Legislative Council) आहे.
विधान परिषदेसाठी या निवडणुकीसाठी भाजप-3, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 1 आणि एकनाथ शिंदे शिवसेना 1 असाच फॉर्म्युला असणार आहे. मात्र अजित पवार गटाला मिळालेल्या एका जागेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे. मात्र या गर्दीत आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात झिशन सिद्धकी व अहिल्यानगरमधील संग्राम कोते यांना यश आले असल्याचे त्यांच्या नावाच्या चर्चेवरून समजते आहे.
आक्रमक व युवा चेहरा
संग्राम कोते पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष फुटीपूर्वी पासून पक्षात विद्यार्थी संघटनेपासून काम केले आहे. पक्षफुटीनंतर त्यांनी अजित पवारांनाच साथ दिली. विशेष म्हणजे कोते राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक व आंदोलक चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवकचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. विरोधी बाकावर असताना सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलनाच्या माध्यमांतून त्यांनी पाच लाख कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत लढाई छेडली होती.
दादांचे विश्वासू म्हणून कोते यांची ओळख
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले कोते यांची ओढ राष्ट्रवादीकडेच होती. पक्षातील फुटीनंतर देखील त्यांनी अजित दादांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभेतील मोठ्या यशानंतर शिर्डी येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरीची मुख्य धुरा ही त्यांनी व्यवस्थित सांभाळली. अजितदादांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख पक्षात आहे.
दूरदृष्टीकोन असलेलं व्यक्तिमत्व
कोते यांनी वन बूथ टेन युथ ही संकल्पना राज्यभर राबविली होती. तसेच आक्रमक चेहरा असलेल्या कोते यांनी केंद्र व राज्य सरकारच्या यांच्याविरुद्ध तब्बल १०० हून अधिक मोर्चे महाराष्ट्रामध्ये काढलेले . गाव व महाविद्यालय तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा या उपक्रमाअंतर्गत तीन हजाराहून अधिक शाखा विद्यार्थी काँग्रेसच्या अन्य राज्यात अनावरण केल्या. नवनवीन उपक्रम राबवून अनोख्या पद्धतीने पक्ष संघटना बळकट करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे यामुळे या युवा खांद्यावर अजित दादा जबाबदारी टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
घरातूनच मिळाले राजकारणाचे बाळकडू
संग्राम कोतेयांचे वडील ऍड. शिवाजीराव कोते तसेच चुलते यांनी जिल्हा परिषद व गणेश सहकारी साखर कारखान्यांवर प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीचे शिर्डी शहर अध्यक्ष, मग राहता तालुका, नगर जिल्हा अशा चढत्या क्रमाने काम करीत महाराष्ट्राचे उपाध्यक्षपद मिळविले. त्यानंतर मात्र त्यांच्याकडे विद्यार्थी आघाडीची राज्याची जबाबदारी देण्यात आली.