Vidhansabha Election : वंचितकडून तिसरी यादी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा
Vanchit Bahujan Aghadi candidate list :विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत एकूण 30 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. संगमनेरमधून वंचितने अझीझ अब्दुल व्होरा यांना उमेदवारी दिली.
शिवाजीराव भोसले बॅंक फसवणूक प्रकरण; मंगलदास बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 10 उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांची नावे आहेत. त्यामुळं वंचितने आतापर्यंत 51 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे वंचितने आपल्या यादीत उमेदवारांच्या नावांसोबत जातीचाही उल्लेख केला आहे.
धुळे शहर मतदारसंघासाठी जितेंद्र शिरसाट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ते बौद्ध समाजाचे असल्याचे प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आलं. तर सिंदखेडा मतदारसंघातून राजपूत समाजाचे भोजासिंग तोडरसिंग रावल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमरेड मतदारसंघातून बौद्ध समाजाच्या सपना राजेंद्र मेश्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बल्लारपूर मतदारसंघातून कुणबी समाजाचे सतीश मुरलीधर माळेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
श्याम मानव यांच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/kblZxhymY3
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 16, 2024
चिमूर विधानसभा मतदारसंघातून माना समाजाचे अरविंद आत्माराम सांदेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. किनवट मतदारसंघातून प्रा. विजय खुपसे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ते आंध-आदिवासी समाजाचे आहेत. तर नांदेड उत्तरमधून गौतम दुथडे यांना उमेदवारी देण्यात आली.
देगलूर विधानसभा मतदारसंघातून बौद्ध धर्माचे सुशीलकुमार देगलूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विठ्ठल तळेकर यांना पाथरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. ते माळी समाजाचे आहेत. परतूर-आष्टी मतदारसंघातून माळी समाजाचे रामप्रसाद थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. घनसावंगीमधून कावेरीताई बळीराम खटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
जालन्यातून डेव्हिड धुमारे, बदनापूरमधून सतीश खरात, देवळालीतून अविनाश शिंदे, इगतपुरीतून भाऊराव काशिनाथ डगळे, उल्हासनगरमधून डॉ.संजय गुप्ता, अणुशक्तीनगरमधून सतीश राजगुरू, वरलीत अमोल आनंद निकाळजे, पेणमध्ये देवेंद्र कोळी, आंबेगाव मतदारसंघात दीपक पंचमुख, संगमनेरमधून अझीझ अब्दुल व्होरा, राहुरी येथे अनिल भिकाजी जाधव, माजलगाव मतदारसंघातून शेख मंजूर चांद, लातूर शहरातून विनोद खडके, तुळजापूरमधून डॉ.स्नेहा सोनकाटे, उस्मानाबादमध्ये प्रणित शामराव डिकले, परंडा मतदारसंघात प्रवीण रणबागुल, अक्कलकोट मतदारसंघातून डॉ संतोषकुमार इंगळे, माळशिरसमध्ये राज यशवंत कुमार आणि मिरज मतदारसंघातून विज्ञान प्रकाश माने यांची घोषणा झाली आहे.