श्याम मानव यांच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
Shyam Manav : भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी (BJP Yuva Morcha) नागपुरात श्याम मानव (Shyam Manav) यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालत कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आक्रमक कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळी पोलीस (Nagpur Police) बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शरद पवारांची मोठी खेळी, आमदार किशोर जोरगेवार तुतारी होती घेणार?
बोले पेट्रोल पंपाजवळील विनोबा विचार केंद्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘संविधान बचाव महाराष्ट्र बचाव’ या विषयावर मानव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्याचबरोबर सध्याची राजकीय परिस्थिती, लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील बेरोजगारी, गुजरातमध्ये जाणारे उद्योग, आरक्षणाचे काय होणार? या विषयांवर मानव आपली भूमिका मांडणार होते. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होता. मात्र त्यापूर्वीच सभागृहात प्रेक्षकांची गर्दी जमली होती. या भागात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बसले होते.
आचारसंहितेत निर्णय जाहीर, शिंदे सरकारला भोवणार? आयोगाकडून कारवाईचे संकेत
दरम्यान, श्याम मानव यांच्या भाषणापूर्वीच भाजप युवा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. संविधान बदलाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण केले जात आहे. राजकीय मुद्दे उपस्थित करून काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी ही सभा घेतली जात असल्याचा आरोप करत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. २०१४ पासून संविधानात कोणते बदल झाले, ते त्यांनी सांगावं, ते कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, तेही सांगावं असे प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.
संपूर्ण गदारोळात श्याम मानव मंचावर बसून राहिले होते. श्याम मानव यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या लोकांनीही भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शाम मानव यांचे भाषण झाले.
दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना श्याम मानव यांनी आचारसंहिता असतानाही भाजप कार्यकर्ते घालत असलेला गोंधळ संविधान भुडवत असल्याचा आरोप केला.