Download App

‘एक शिंग तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही’, संजय गायकवाड राऊतांवर भडकले

Sanjay Gaikwad : मी एक शिंग संजय राऊतांच्या नरड्यात खूपसल्याशिवाय राहणार नाही, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Sanjay Gaikwad : देवेंद्र फडणवीसांन (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोन महिने उलटले, तरीही ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी राहायला गेले नाहीत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) आरोप केले. एकनाथ शिंदेंनी कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची शिंग पुरली असल्याने फडणवीस तिथे राहायला जात नसल्याचा दावा राऊतांनी केला. यावरआता आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाष्य केलं.

Delhi Elections Result: केजरीवाल अडचणीत? ACB ने बजावली नोटीस, विचारले ‘हे’ 5 प्रश्न 

मी एक शिंग राऊतांच्या नरड्यात खूपसल्याशिवाय राहणार नाही, असं आमदार गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांच्या दाव्याविषयी विचारले असता गायकवाड यांनी सडेतोड उत्तर दिले. संजय राऊत हे नेहमीच एकनाथ शिंदेंना डिवचतात. शिंदेंनी शिंगे आणली, असं बोलतात. नेहमी शिंग आणून पुरले, शिंग आणून पुरले, असं राऊत सांगत राहतात. माझं राऊतांना सांगण आहे की, एक शिंग मी नक्की आणणार आणि ते तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत तुझी बडबड बंद होणार नाही, असा संताप गायकवाड यांनी केला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रोत्साहन! आयोजक संस्थांना शासनाचं अर्थसहाय्य 

पुढं ते म्हणाले, मला दिसतंय की संजय राऊत अंधश्रद्धेचे बळी आहेत. कामाख्या देवी ही भारतातील अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो आणि त्यावेळी जागृत देवस्थान असलेल्या कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. एकनाथ शिंदे यांनीही त्या ठिकाणी दर्शन घतेलं, असं गायकवाड म्हणाले.

भाजप, एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचार घेऊन पुढे जातेय. हे राऊतांच्या डोळ्यात खूपत आहे, असंही ते म्हणाले.

पालकमंत्री पदावर संजय गायकवाड स्पष्टच बोलले
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत मतभेद सुरू आहेत. यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, तिथे शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेचाच पालकमंत्री असायला हवा. माझ्या जिल्ह्यात एक भाजप आमदार आणि एक राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र, पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीला दिले. हा भाजपच्या लोकांवर अन्याय आहे. त्यामुळे रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच असावा, असं गायकवाड म्हणाले.

follow us