Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा

Sanjay Gaikwad on Sanjay Raut : शिंदे आणि ठाकरे गटामध्ये सध्या खंडणी आणि पैसा या मुद्द्यांवरून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. Video : अशोक टेकवडेंवर कोणी अन्याय केला? अजितदादा की सुप्रिया सुळे एका वृत्तवाहिनीशी बोलताना […]

Untitled Design (79)

Sanjay Gaikwad criticizes Aditya Thackeray

Sanjay Gaikwad on Sanjay Raut : शिंदे आणि ठाकरे गटामध्ये सध्या खंडणी आणि पैसा या मुद्द्यांवरून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करताना एक धक्कादायक खुलासा केला आहे.

>Video : अशोक टेकवडेंवर कोणी अन्याय केला? अजितदादा की सुप्रिया सुळे

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, एकनाथ शिंदे हे वसुली करणारे किंवा खंडणी घेणारे नाहीत. उलट मातोश्रीवर त्यांनी किती पैसे दिले असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत नसेल. त्यांच्या पैशांवरच ठाकरेंच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत. तसेच राऊतांसारखे लोक मोठे झाले आहेत. त्यामुळे राऊतांनी शिदेंवर आरोप करताना विचार करायाला हवा अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

‘एमआयडीसी’साठी रोहित पवारांचे उपोषणाचे हत्यार ! सरकारला दिली ‘डेडलाइन’

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंवर तसेच देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका करताना गंभीर आरोप केले होते की, राज्यात खंडणीखेरर सरकार आहे. त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमलेले आहेत. असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

त्यावरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं होतं. अनेकांनी राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. त्यामध्ये आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्त्युत्तर देत धक्कादायक खुलासे केले आहे.

Exit mobile version