Karnataka च्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला! ‘हे’ होणार मुख्यमंत्री, शनिवारी शपथविधीची शक्यता
Karnataka CM : कर्नाटक (Karnataka) निवडणुकीचे निकाल लागून 4 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या नावावार निर्णय घेऊ शकलेला नाही. नेमकं मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमधील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सध्या 2 नावे आघाडीवर आहेत. यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नावांवर दिल्लीत खलबत सुरु आहेत. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांच्या मॅरॅथॉन बैठका सुरू आहेत.
Karnataka CM : सिद्धरामय्या-शिवकुमार यांच्यावरुन बड्या नेत्यांमध्ये मतभेद; तिसरा चेहरा येणार समोर?
या दरम्यान आता एक महत्त्वाची महिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच अखेर सुटला आहे. कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी सिद्धरमय्या विराजमान होणार असल्याचं बोलंल जात आहे.
Karnataka CM : सुशीलकुमार शिंदेंनी सोडवला कर्नाटकच्या CM पदाचा तिढा; सुचवले 2 मोठे पर्याय
त्याचबरोबर अशी देखील चर्चा आहे की, डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार असं देखील सांगण्यात आलं आहे की, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षमल्लिकाजुर्न खर्गे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत यावर एकमत झालं असल्याचं बोललं जात आहे.
शनिवारी 20 मे ला कर्नाटकच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बंगळुरू या शहरात हा शपथविधी पार पडणार आहे. तर डीके शिवकुमार आणि सिद्धरमय्या हे दोघे अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील अशी देखील चर्चा सुरू आहे.