“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

Sanjay Gaikwad on Shweta Mahale श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना गायकवाडांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Sanjay Gaikwad on Shweta Mahale

Sanjay Gaikwad on Shweta Mahaleश्वेता महाले यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून 42 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Sanjay Gaikwad on Shweta Mahale: भाजप आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महिलांच्या शरीरयष्टीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करत एका 42 वर्षीय महिलेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी मध्यरात्री गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.

मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला

बुलढाण्यातील चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात त्यांच्या मित्रपरिवाराकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवण्यात आले. या गाण्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती.

यावेळी गायकवाड यांनी श्वेता महाले यांच्या संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. ‘बाप तो बाप रहेगा’ हे एखाद्या पुरुषाने म्हटल्यास ठीक आहे, मात्र महिलेने असे म्हटल्यास त्याचा संदर्भ देत त्यांनी महिलांच्या शरीरयष्टीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. तसेच, राजकारणातला बाप कोण आहे, हे योग्य वेळी दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.

काय म्हणाले गायकवाड

“राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांनी रॅली काढून वाढदिवस साजरा करणे योग्य वाटले नाही. माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ती विकासाच्या मुद्द्यावर करा. मी एखाद्या शेतकऱ्याला मदत करत असेन, तर तुम्हीही त्यासाठी पुढे या. वाढदिवसाच्या जल्लोषावर खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे अधिक योग्य आहे. आम्हीही वाढदिवस साजरे करतो, मात्र अशा प्रकारे अनावश्यक खर्च करत नाही.

मोदी, पुतिन, जिनपिंग अन् पेजेशकियन एकाच मंचावर; ब्रिक्समधून भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’चे दर्शन

‘बाप तो बाप रहेगा’ हे एखाद्या पुरुषाने म्हटले तर ठीक आहे; मात्र एखाद्या महिलेने असे म्हणताना बापासारखे शरीर कुठून आणणार, असा सवाल त्यांनी केला. असे बोलणे शोभते का? राजकारणातला खरा बाप कोण आहे, हे योग्य वेळी आम्ही दाखवून देऊ,” असे संजय गायकवाड म्हणाले.

गायकवाड यांचे हे वक्तव्य सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. त्यानंतर एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करत या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचा आरोप केला. गायकवाड यांनी जाणीवपूर्वक अशी टिप्पणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही! ‘मुंबईला धमकी, गणेशोत्सवात आंदोलन का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा

या तक्रारीची दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

Exit mobile version