Download App

‘संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा…’; संजय गायकवाडांची बोचरी टीका

संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.

  • Written By: Last Updated:

Sanjay Gaikwad : राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवला. महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 49 जागांवर यश मिळालं. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) निवडणूक निकालावरून महायुतीवर जोरदार टीका केली. हा लावून घेतलेला निकाल आहे असं म्हणत ईव्हीएमवर (EVM) शंका घेतली होती. दरम्यान, राऊतांच्या टीकेला आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.

निवडणुक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘निकालाविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार…’ 

संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.

संजय गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांच्या वक्तव्याविषयी विचारले असता गायकवाड म्हणाले, राऊत हे ईव्हीएमवर शंका घेतात. पण, आदित्य ठाकरे हे देखील ईव्हीएममधून विजीय झालेत. मग आता त्यावरही आक्षेप घेणार का? ठाकरे गटाचे लोकही निवडून आले आहेत ना? त्यावर राऊत आक्षेप घेतील का? असा सवाल करत त्यांचा हा रडीचा डाव आहे. पण, महायुतीला मिळालेला विजय हा आमच्या कामाचा परिणाम आहे. लाडक्या बहिण योजनेचा परिणाम आहे, असं गायकवाड म्हणाले.

हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री, 28 नोव्हेंबरला घेणार शपथ 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे गुजराती लॉबी ठरवेल, तसेच सरकारचा शपथविधी हा गुजरातमधील स्टेडियममध्ये व्हावा, असा खोचक सल्ला राऊतांनी दिला होता. त्यावरही गायकवाड यांनी भाष्य केलं. संजय राऊत यांचे कोणतेही विधान आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते वेडे आहेत. त्यांची आता मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. तसेच ते आता आयुष्यात कधीच खासदार होणार नाही, असेही संजय गायकवाड म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

निवडणूक निकालावर बोलताना राऊत म्हणाले होते की, मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरातची लॉबी ठरवेल. महाराष्ट्रातात त्यांनी शपथ घेण्याऐवजी गुजरातमध्ये शपथविधी सोहळा घ्यावा. गुजरातमध्ये मोदींचे नाव असलेले स्टेडियम आहे. तिथे जास्त लोक बसतात. त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी सोहळा घ्यावा, हेच संयुक्तित ठरेला. शिवतीर्थावर शपथविधी सोहळा घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. वानखेडे स्टेडियमवर घेतल्यास 106 हुतात्म्यांचा अपमान होईल, असं राऊत म्हणाले होते.

follow us