कसबा पोटनिवडणुकीतला पराभव हा चंद्रकांत पाटील, स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही, असे मत माजी खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीमध्ये संजय काकडे यांनी कसबा पोटनिवडणूक,सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय भविष्य यावर रोखठोक मते व्यक्त केली. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा : Sanjay Kakade: सातवी पास संजय काकडेंचा सत्ता दरबारात शिरकाव कसा….अनकट संजय काकडे
कसबा पोटनिवणुकीत भाजपचा पराभव का झाला, असा प्रश्न काकडे यांना विचारल्यावर काकडे म्हणाले की, २७ वर्षे आमचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघात जेव्हा आमचा पराभव होतो, तेव्हा आम्हाला नक्की विचार करायची गरज आहे. त्यामुळे आम्ही आलेल्या मतदानाचा प्रभाग, बूथनुसार अभ्यास करून त्याच विश्लेषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कसबा पोटनिवडणुकीत फक्त उमेदवार म्हणून विचार केला तर हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्या तुलनेत धंगेकर कायम सरस होते. त्यामुळे उमेदवार चुकला असं रोखठोक मत काकडे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, जो उमेदवार स्वतःच्या प्रभागात लीड मिळवू शकत नाही. त्याला उमेदवारी देणे आमची चूक होती.
निवडणुकीपूर्वी पक्षाने सर्वे केला होता पण तो सर्वे आम्हाला दाखवला नाही. तो थेट दिल्लीला पाठवण्यात आला. जर तो सर्वे आम्हाला दाखवण्यात आला असता तर त्यातल्या चुका सांगता आल्या असत्या, असं मतंही काकडे यांनी यावेळी व्यक्त केले.
पराभव झाला यामध्ये पराभवाचा दोष सगळ्या स्थानिक लोकांचा आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते, चंद्रकांत पाटील आणि माझ्यासारख्या लोकांचा आहे. असं मत त्यांनी मांडल.
निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते, पण त्यांना यात दोषी धरणं चुकीचे आहे. कारण स्थानिक लोकांनी त्यांना जे सांगितलं तेच त्यांनी केलं. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रचाराला आले होते पण त्यांना यात दोषी धरणं चुकीचे आहे. ते आमच्या पक्षाचे नाहीत ते सहयोगी पक्षाचे नेते आहेत. तरीही ते आले आणि त्यांना प्रचार केला. पण यात त्याची चूक नाही. चूक स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची आहे कारण आम्ही फिल्डवर होता, आमची चूक आहे, असं रोकठोक मत काकडे यांनी व्यक्त केले.
कसाब पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज असल्याचा चर्चा होत्या. पण तसं काही चित्र नव्हतं, असं मत काकडे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की ब्राह्मण समाज नाराज असता तर आम्हाला ६३ हजार मते पडली नसती. काही प्रमाणात ब्राह्मण समाज नाराज होता, पण त्याचा विशेष काही फरक पडला नाही.
कसबा निवडणुकीत आजारी गिरीश बापट यांना प्रचाराला आणल्यामुळे भाजपवर टीका झाली. पण आम्ही बापट यांना प्रचाराला आणलं आम्ही आणलं नाही ते स्वतःहून आले. असं स्पष्टीकरण संजय काकडे यांनी दिलं. ते म्हणाले की गिरीश बापट यांनी १० निवडणुका पाहिल्या आहेत, म्हणजे ५० वर्ष त्यांनी राजकारण पाहिलं आहे. त्यातील ३० वर्षे त्यांनी सक्रिय राजकारण केलं आहे. त्यामुळे अचानक लागलेल्या निवडणुकामुळे ते स्वतःहून प्रचाराला आले.