Download App

निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करतोय; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Allegations On BJP : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना उधाण आलंय. दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष (BJP) मतदार यादीत घोटाळे करायला लागला आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. राऊत नेमकं काय म्हणालेत? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

संजय राऊत म्हणाले की, काल कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची साधारण दहा तास बैठक झाली. त्या बैठकीनंतर आज सकाळी माझी आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा (Maharashtra Assembly Election) झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेना नेते यांची तातडीची बैठक बोलावली. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल आणि आज साडेबारा वाजता पक्षप्रमुख यांनी तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. आम्ही सगळे आता मातोश्रीवर जाऊ चर्चा करू. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू. आम्हाला असं वाटतं, महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे. ती जवाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे महाराष्ट्रात ‘संविधान बचाव’चा मुव्हमेंट आहे, ते यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातून पराभव करू शकलो.
Sanjay Raut on BJP : भाजप म्हणजे बिश्नोई गँग; संजय राऊतांचा ईडी, सीबीआय’वरून भाजपवर वार

विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकटीचा पराभव सहज करू शकतो. नक्कीच महाराष्ट्रात त्या दृष्टीने पावलं पडत आहेत. कोणी काही म्हणू द्या, या राज्यात सत्ता परिवर्तन होणार हे नक्की. काल बैठक सुरू असताना आणखी एका विषयाला महत्त्वाचा हात घातला तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकता याव्या, भारतीय जनता पक्ष पराभवाच्या खाईत आहे, भारतीय जनता पक्ष डूबत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनता गेली मतदार गेली आहे, त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करायला लागला असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

भारतीय जनता पक्ष ज्या मतदारसंघात लढणार आहे, ते साधारण 150 मतदारसंघ आहेत. त्यात शिंदे किंवा अजित पवार नाही, त्यांना बाजूला ठेवलं आहे. किमान 150 मतदारसंघात भारतीय जनता पक्ष प्रत्येक विधानसभा मतदान यादीमध्ये जे पक्के मतदार आहेत, ज्याने साधारण त्यांना असं वाटतं त्यांनी महाराष्ट्र महाविकास आघाडीला लोकसभेला मतदान केलं. ते 10 हजार नावं प्रत्येक मतदारसंघातून काढायची. त्या बदल्यात दहा हजार बोगस नावं टाकायची. खोटे आधार कार्ड, खोटे ओळखपत्र या माध्यमातून 10,000 प्रत्येक मतदार संघामध्ये फक्त भारतीय जनता पक्ष निवडणुका लढणार आहे, असे दीडशे मतदारसंघ त्याच्यामध्ये शिंदेगट आणि अजित पवार जिथे लढणार तिथे नाही. हा घोटाळा लोकशाहीतला सर्वात मोठा घोटाळा होत आहे.
Sanjay Raut : संजय राऊतांचा कंगनाशी ‘पंगा’; म्हणाले आम्ही तिला…

हरण्याच्या भीतीने निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला अशाप्रकारे मदत करत असेल, तर मला वाटतं या देशातल्या लोकशाहीची हत्या झाली
. निवडणूक आयोग हा गृह मंत्रालयाच्या आखेतारीत येतो म्हणजे अमित शहा ह्या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. महाराष्ट्रातल्या बीजेपीचे चार प्रमुख नेते या सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्याला आता राज्यपाल नियुक्त आमदार केलं आहे, तो या सगळ्याचा सूत्रधार आहे. आम्ही मतदारांना जागृत करून प्रसंगी रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाला चाल करून जाऊ. तुम्हाला अशा प्रकारे निवडणुका जिंकता येणार नाही. तुम्ही मर्द, असाल तर लोकशाही मार्गाने आमच्यासमोर उतरा आणि जिंकून दाखवा, असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय.हरियाणा आणि झारखंडमध्ये जे केलं तेच आता महाराष्ट्रात सुद्धा करायला जात आहे. आम्ही जागतिक स्तरावर हा प्रश्न उचलू. बावनकुळे हे या घोटाळ्याचे एक प्रमुख सूत्रधार आहे. हा घोटाळा कसा करावा आणि कसा केला जावा? यासाठी त्यांनी नागपूरला एक शिबिर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घेतल्या. त्यांनी एक विशेष शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, मतदार यादीतून दहा हजार नाव कसे ओढायची आणि आपली नाव कशी घालायची यासाठी प्रशिक्षण शिबीर बावनकुळे यांनी नागपुरात घेतलं, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केलीय.

राज्यात 20 तारखेला मतदान आहे. 23 तारखेला निकाल आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. एवढा कमी वेळ दिला जात नाही. तुम्ही आतापर्यंत इतिहास पाहिला असेल, महाविकास आघाडी निवडणुका लढते आणि जिंकणार आहे. 23 ला तर मतमोजणी आहे, तर निकाल पूर्ण लागेपर्यंत 24 तारीख उजाडणार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जिंकलेल्या आमदार इकडे येतील. त्यांना अजून वेळ लागेल महाराष्ट्र फार दुर्गम आहे. 26 तारखेला बैठका घेणे, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणे, राज्यपालाकडे दावा करणे, यासाठी किमान वेळ लागतो तो दिलेला नाही. 26 तारखेला जर सरकार बनवू शकले नाही, तर राष्ट्रपती राजवट पुढे सहा महिने लावा हे फार मोठे कारस्थान अमित शहा यांचे आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचा सरकार बनू द्यायचे नाही. राष्ट्रपती राजवट लगेच लावायची म्हणून फक्त दोन दिवसाचा कालावधी सरकार बनवायला दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घाणेरडा प्रकार झाला नाही, तो अमित शाह करत आहे. कारण ते महाराष्ट्रातल्या एक नंबरचे शत्रू आहेत. बाकी एकनाथ शिंदे, फडणवीस ,अजित पवार हे त्या महाराष्ट्रातल्या दुश्मनांचे हस्तक आहेत मांडलिक आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

 

follow us