Download App

Sanjay Raut : एकदा होऊनच जाऊ दे महाराष्ट्र कोणाचा; राऊतांचे थेट आव्हान

Sanjay Raut On Eknath Shinde :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस ( Eknath Shinde Devendra Fadanvis )  सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सध्या बिकट अवस्था आहे. सरकारने अद्याप कोणतीही मदत त्यांना जाहीर केलेली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच कालचे बजेट हे निवडणुकीच्या अनुषंगाने सादर केलेले बजेट असल्याचे ते म्हणाले आहेत. या सर्व विषयांवरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे, त्यामुळे शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावरती जाऊन आंदोलन करत आहे. तात्काळ पंचनामे करा, तात्काळ मदत करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी राज्य सरकारला दिला आहे.

तसेच सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे की घटनेनुसार काम झालं आणि निर्णय लागला तर सुरुवातीचे 16 आमदार अपात्र ठरतील व त्यानंतर हे सरकार कोसळेल, असे राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे हे सरकार कोसळल्यानंतर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून हे बजेट सादर केल्याची टीका राऊतांनी केली आहे.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते… दानवेंचा राज ठाकरेंना टोला

राज्य सरकार हे डरपोक आहे.  आम्ही रोज सांगतो निवडणुका घ्या पण विरोधी पक्ष कधीच सांगत नाही की निवडणुका घ्या.  एकदा आमने-सामने होऊ द्या शिवसेना कोणाची?  महाराष्ट्र कोणाचा हा फैसला होऊन जाऊ दे, अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us