‘कशाला तोंड उघडायला लावता’; संजय राऊत नार्वेकरांवर भडकले

Sanjay Raut On Rahul Narwekar :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च  न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देताना शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यावरुन संजय राऊतांनी नार्वेकरांना सुनावले आहे. परदेशात बसून ते बोलत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे. त्यांच्यापुढे जो न्यायासाठी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T121702.257

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 15T121702.257

Sanjay Raut On Rahul Narwekar :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च  न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देताना शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यावरुन संजय राऊतांनी नार्वेकरांना सुनावले आहे.

परदेशात बसून ते बोलत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे. त्यांच्यापुढे जो न्यायासाठी येणार आहे, त्या संदर्भात ते मुलाखती देत आहेत. मी निर्णय घेईल याचा परिणाम त्या खटल्यावर होऊ शकतो.  यामध्ये राजकारण आहे आपण आधी मुंबईत या, आपण खुर्चीवर बसा आणि मग आमची जी भूमिका आहे, ती समजून घ्या, मला माहिती आहे, पक्षांतराविषयी त्यांना तिरस्कार नाही त्यांनी अनेक पक्षांतर केलेत, असा टोला त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना पुन्हा ईडीची नोटीस चौकशीला हजर राहण्याचे आदेश

नार्वेकर हे सुशिक्षित कायदा शिकलेले आहेत. त्यांना कायदा कळतो. ते शिवसेनेचे वकील होते. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात हे सगळ्यांना माहित आहे. ते आमचे वकील होते. सुप्रीम कोर्टात त्यांना शिवसेना काय आहे, माहित आहे. त्यामुळे आम्हाला कशाला तोंड उघडायला लावतात, असे ते म्हणाले आहेत.

Raj Thackeray : …अन्यथा पराभव ‘अटळ’; अटलजींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत, राज ठाकरेंचा भाजपला सल्ला

16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातला निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं. त्याचा निर्णय अशा सरकारकडे आहे ज्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.  ते सरकार बेकायदेशीर आहे आणि आता अशा बेकायदेशीर सरकारचे आदेश कुणी पाळू नये, ते आता बेकायदेशीर ठरतील आणि बेकायदेशीर आदेशाचे पालन केल्याबद्दल भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना चौकशीला, कारवाईला सामोरे जावे लागेल, असे राऊत म्हणाले आहेत.

Exit mobile version