Sanjay Raut on Vijay Shah : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. शाह यांनी कुरेशी यांचा उल्लेख दहशदवाद्यांची बहिण असा केला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut यांनीही यावर भाष्य केलं.
#PahalgamAttack : हॅशटॅग युद्धाचा काही ठोस परिणाम होतो का? सरकार ऐकतं का? घ्या जाणून…
विजय शाह हा मोदींचा जावई आहे का? तो मंत्रिमंडळात अजून आहेच कसा? त्याची हकालपट्टी करून अटक करा, अशी मागणी राऊतांनी केलीय
शाहची हकालपट्टी करा…
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. विजय शाह यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, विजय शाह यांनी अनेक प्रकारची अशी विधाने केली आहेत. मध्यप्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं, हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणं, अशी प्रकारचं विधान करणं यासाठी शाह कुप्रसिध्द आहे. सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रायलयाने केली आहे. कुरेशी यांचं संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात होतं. अशा कुरेशी यांना पाकिस्तानी किंवा दहशतवादी म्हणणं हा देशद्रोह आहे. मोदी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री खरे राष्ट्रभक्त असतील तर त्यांनी विजय शाहची हकालपट्टी करून अटक केली पाहिजे.
शाह मोदींची जावई लागतो का?
विजय शाह मोदींची जावई लागतो का? उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मग ते अजूनही मंत्रिमंडळात कसे? असा सवालही राऊतांनी केला. ते पुढं म्हणाले, शिवराज सिंह यांच्या पत्नीविरुद्धही त्यांनी असंच विधान केलं होतं.आता संपूर्ण देश सोफिया कुरेशी यांना मानवंदना करतोय आणि विजय शाह त्यांच्याविषयी वादग्रस्त विधान करतोय. या विजय शाहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. गुन्हा दाखल करून अटक करावी. एवढेच नाही तर त्याची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे, असं राऊत राऊत म्हणाले.
शाह काय म्हणाले होते?
शाह यांनी मंगळवारी महू येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, ज्यांनी आपल्या मुलींचे-बहिणींचे कुंकू पुसले होते, त्या कटे-पटे लोकांना आम्ही त्यांचीच बहिण पाठवून त्यांची ऐशीच्या तेसी केली. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्यांचे कपडे काढू शकत नाही. पण, त्यांच्याच समाजाची बहिण त्यांच्याकडे पाठवली, त्यांनी आपल्या बहिणींना विधवा केलं. पण त्यांच्या समाजाच्या बहिणीनं त्यांना धडा शिकवला. त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्र करून सोडले, असं शाह म्हणाले होते.