Sanjay Raut : ब्रिटीशकालीन कायदा रद्द केलायं पण ब्रिटीश कायद्यालाही मागे टाकणारे कायदे वापरुन विरोधकांना अडकवत असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलीयं. काल केंद्र सरकारकडून देशद्रोहाचा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावर बोट ठेवत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Criticize BJP government for canceled British Laws )
… म्हणून भिंवडीलाच सिरिया बनवायचं होतं; बडोदावालाच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
संजय राऊत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी ब्रिटिश कालीन कायदा रद्द केलायं पण, त्या कायद्यालाही मागे टाकणारे कायदे वापरून राजकीय विरोधकांना अडकवलं जात आहे.राजकीय दृष्ट्या भविष्यात त्यांना त्रास होईल, अशा लोकांना तुम्ही तुरुंगात टाकत आहात, त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याचं फारसं कौतुक सांगू नका, असं राऊत म्हणाले आहेत.
पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकातदादांकडं ‘सेफ’; अजितदादांच्या वक्तव्याने संभ्रम मिटला?
केंद्र सरकारकडून ब्रिटिशांपेक्षा भयंकर कायदे निर्माण केले जात आहेत. या कायद्यांचा वापर करुन राजकीय विरोधकांना जेरीस आणलं जात आहेत. जे तुमच्या पक्षात ते निर्मला वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेत असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली आहे. तसेच अजित पवार गटातील नेत्यांवरही राऊतांनी जहरी टीका केली असून ते म्हणाले, जे नेते तुरुंगाच्या वाटेवर होते, त्यांनाच सत्ताधाऱ्यांनी मंत्री केलं आहे.
मलिकांना जामीन मिळाल्याचा आनंदच :
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 16 महिन्यांनंतर मेडिकल ग्राऊंडमुळे जामीन देण्यात आला आहे. आम्हाला आनंद आहे आमचे सहकारी नवाब मलिक त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. जामीन मिळत नाही हे राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी कारस्थानच आहे.
दरम्यान, राजस्थानात पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच पैशांच्या आणि केंद्रीय यंत्रणांच्या जोरावर सरकार तोडणे हा देशद्रोसारखाच अपराध असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.