Download App

‘…त्यांना थोडीशी लाज’, बावनकुळेंचं कॉंग्रेस फोडा विधान, संजय राऊतांचा संताप

Sanjay Raut Criticize Chandrashekhar Bawankule Statement On Congress : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कॉंग्रेस (Congress) पक्ष फोडण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची (Sanjay Raut) प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शाह असतील यांनी भाजप पक्ष वाढवलाचं नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी केलंय.

देशाच्या स्तरावर हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला आहे. बावनकुळे आणि मंडळीने पैशाचा आणि सत्तेचा वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूद आणली. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजनल पक्ष (Maharashtra Politics) नाही. इतरांचे पक्ष फोडणे आणि आपल्यासोबत भ्रष्टाचाऱ्यांना देखील एकत्र घेतले अन् आपला पक्ष वाढवला. मात्र, उद्या यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असणार आहे.

मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर; मुलींची बाजी, ९१.८८ टक्के उत्तीर्ण, लातूर पॅटर्न ‘फेल’

चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते मंत्री आहे. त्यांना थोडीशी लाज वाटली असती तर त्यांनी कॉंग्रेस फोडा असं विधान केलं नसतं. तुमचा पक्ष विचार धारेवर वाढवा, दुसऱ्यांचे पक्ष चोरी का करतात? आजचा भारतीय जनता पक्ष हा 70 टक्के उपऱ्यांचा पक्ष आहे. त्यांच्या मंत्रीमंडळातील मूळ लोकं बाजूलाच आहेत. किमान 70 टक्के लोक बाहेरचे आहेत. यांचा भाजपच्या विचारधारेशी कोणताही संबंध नाही. हे सगळे लोक सोबत घेवून सरकार स्थापन करताना लाज वाटली पाहिजे, अशी टीका देखील राऊतांनी केली आहे.

एवढं करून सुद्धा त्यांची भूक भागत नाही. बावनकुळे यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाही. शिवसेना फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, आता ते शिंदे यांची शिवसेना देखील फोडणार आहेत, ते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फोडणार आहेत. कारण त्यांचे नेते अमित शाह यांची देखील विचारधारा तीच आहे. दुसऱ्यांचा पक्ष फोडा अन् आपला पक्ष वाढवा, जसं मुघलांना संताजी-धनाजी दिसायचे, तसं यांना स्वप्नात फक्त फोडाफोडी दिसते, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय.

‘मुक्कम पोस्ट देवाच घर’ चित्रपट 5 भारतीय भाषांमध्ये डब; मराठी चित्रपटसृष्टीचं एक अभूतपूर्व पाऊल

अजित पवार आणि शरद पवार हे भेटतात. त्यांचे काही संस्थापक कार्यक्रम असतात. पण राजकीयदृष्ट्या म्हटलं तर, शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाहीत. आमचं देखील ठाकरेंचं कुटुंब आहे, पण आमच्या स्वभावात त्यांच्या स्वभावात फरक आहे. अमित शाहांनी अजित पवारांना हाताशी धरून पक्ष फोडला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपबरोबर राहून कदापी मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हायला लागेल, असा देखील इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

 

follow us