Download App

Sanjay Raut : .. तर अजितदादांचीही आमदारकी रद्द होईल! राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राज्यातील सत्ताधारी पक्षांवर घणाघाती टीका केली. तसेच आज त्यांच्या निशाण्यावर अजित पवारही (Ajit Pawar) होते. राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कोर्टाने आणि विधानसभा अध्यक्षाने कायद्याने वागायचे मनात आणले तर ते पाच मिनिट सुद्धा त्या पदावर राहू शकत नाहीत. तुम्ही 5 वर्षांचं काय सांगता. जर तुम्ही कायद्याने आणि घटनेने वागणार असाल तर अजित पवारांचीही आमदारकी रद्द होईल. 2024 नंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार यांनाही मोठा राजकीय धक्का बसेल असा दावा राऊत यांनी केला.

Nanded : नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी डीन आणि प्रसुती विभाग प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे घाबरून पळून गेले

राऊत पुढे म्हणाले, स्वतः एकनाथ शिंदे हे घाबरून पळून गेले आहेत. माझ्यासमोर त्यांनी कबूल देखील केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोरही कबूल केले आहे. त्यांच्याभोवती यंत्रणांचा फास आवळला गेला. त्यांच्या जवळच्या बिल्डर आणि सहकाऱ्यांना तपास यंत्रणांनी उचलले होते. त्यानंतरच त्यांच्या पक्ष सोडण्याच्या हालचालींना वेग आला हे सगळ्यांनाच माहिती आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

इंडिया आघाडीच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरही राऊत यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीतील बऱ्याच जणांना ईडीचा धाक अन् अटकेची टांगती तलवार होती. याचाच वापर करून राष्ट्रवादी फोडण्यात आली. सध्या देशात एकतर्फी कारवाई सुरू आहे. जे कुणी सरकारविरोधात बोलतील. सरकारविरोधात जातील त्यांच्या घरी ईडी, सीबीआय पोहोचते, असे राऊत म्हणाले. आणीबाणीच्या काळात ज्या पद्धतीने नेत्यांना तुरुंगात टाकले त्याच पद्धतीने निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीतील नेत्यांना तुरुंगात टाकून हे सरकार निवडणुकीला सामोरं जाईल असा दावा खासदार राऊत यांनी केला. 

Sanjay Raut : फडणवीसांसारखा खोटारडा माणूस मी… राऊतांचा हल्लाबोल

फडणवीस शिंदे-पवारांना हवा घालणार का ?

या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हेच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहतील आणि जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, फडणवीस शिंदेंना या सरकारच्या काळात पूर्ण काळ मुख्यमंत्री ठेऊन अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार आहेत. असं असेल तर मग फडणवीस शिंदे-पवारांना हवा घालत बसणार आहेत का?, असा खोचक सवाल राऊत यांनी केला.

Tags

follow us