Download App

घर घर मोदी चालतं मग जय भवानी का नाही? राऊतांचा निवडणूक आयोगासह भाजपवर घणाघात

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : शिवसेना (उबाठा) पक्षाचं एक गीत आहे. त्यामध्ये “जय भवानी” (Jai Bhavani) या घोषणेवर निवडणूक आयोगाने अक्षेप घेत हा शब्द काढण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान त्यावरून आता चांगलंच राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यावरून निवडणूक आयोगासह भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हमला केलाय. ते माध्यमांशी बोलतं होते.

 

आमच्या घोषणा तुम्हाला खूपतात

संजय राऊत यावर बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात सुरूवातीपासून ‘हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी या घोषणा आहेत. तसंच, या घोषणा महाराष्ट्राच्या अस्मिता आहेत. परंतु, निवडणूक आयोगाने आता या घोषणेवर अक्षेप घेतला आहे. यांना हर हर महादेव ही घोषणा चालत नाही मग यांच घर घर मोदी बरं चालतं असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार घणाघात केलाय. तसंच, तुम्ही महिलांच्या मंगळसुत्रावर बोलता ते चालतं. मात्र, आमच्या घोषणा तुम्हाला खूपतात का? असा उलट प्रश्नही राऊतांनी यावेळी केला आहे.

 

नकली हिंदूत्व आहे

यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या हिंदुत्वावरही जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, आमच्यावर शिवसेनेने हिंदूत्व सोडलं असा आरोप केला जातो. मात्र, शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या आसपासही भाजपचं हिंदुत्व नाही असा थेट प्रहार राऊत यांनी यावेळी केला आहे. तसंच, भाजपचं हिंदूत्व हे व्यापारी हिंदूत्व, नकली हिंदूत्व आहे असा थेट आरोपही राऊतांनी यावेळी केला आहे.

 

भाजपसाठी काम करते

यावेळी बोलताना राऊतांनी निवडणूक आयोगावरही आसूड ओढले आहेत. निवडणूक आयोगाचं आता भाजप निवडणूक आयोग असं नाव ठेवलं पाहिजे अशा शब्दांत राऊतांनी निवडणूक आयोगावर फटकारे ओढले. तसंच, निवडणूक आयोग ही संस्था भाजपसाठी काम करते असा गंभीर आरोपही राऊतांनी यावेळी बोलताना केला आहे.

follow us