Download App

Sanjay Raut : हे तुमचं अपयश की, सगळं तुम्हीच घडवून आणताय? औरंगजेबाच्या फोटोप्रकरणी राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्ला

Sanjay Raut On Shinde-Fadanvis : शिवराज्याभिषेक दिनी समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंद पुकारण्यात आला. मात्र या बंदला बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Sanjay Raut Criticizes Shinde-Fadanvis on Aurangzeb Photo Crises )

Kolhapur बंदला हिंसक वळण; जमावाकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या काही भागात, कोल्हापुरात तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये द्खील असाच प्रकार घडला होता. मात्र शिंदे-फडणवीसांच्या काळात असे औरंगजेबाचे फोटो कसे नाचवले जातात? असा सावाल यावेळी संजय राऊतांनी सरकारला विचारला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, फक्त निवडणुकांसाठी, राजकारणासाठी हिंदुत्व, तणाव निर्माण करायचा राज्याची शांतता भंग करायची. जे लोक असे स्टेटस ठेवतात त्यांच्यवर कठोर कारवाई करण्याची हिंमत तुमच्यामध्ये असायला हवी. असं देखील राऊत म्हणाले.

Sujay Vikhe : समनापूरमधील दगडफेकीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया; ‘म्हणाले ही दंगल…’

राऊतांनी यावेळी शिंदे-फडणवीसांवर आरोप देखील केला की, जर तुम्ही स्वतः ला कडवट हिंदुत्ववादी म्हणता तर तुमचं सरकार असतना असे औरंगजेबाचे फोटो नाचवण्याचे स्टेटस ठेवण्याचे प्रकार कसे घडतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं अपयश नाही का? की हे सगळं तुम्हीच घडवून आणताय? याच उत्तर मिळायला हवं. असा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

दरम्यान सोमवारी अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शिवराज्याभिषेक दिनी समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

Tags

follow us