Kolhapur बंदला हिंसक वळण; जमावाकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

Kolhapur बंदला हिंसक वळण; जमावाकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

Kolhapur Bandh :

हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. मटण मार्केट, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी बाजार आणि सीपीआर हॉस्पिटलच्या मागील बाजूला दगडफेक झाल्याची माहिती आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिकांडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला असल्याची माहिती आहे. या दरम्यान, संतप्त जमावातील काही तरुणांनी या परिसरातील दुकाने बंद पाडली. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. (kolhapur bandh called by Hindutva organizations turned violent and incidents of stone pelting)

शिवराज्याभिषेक दिनी समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कालपासून कोल्हापूर शहरातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली होती. अशातच काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावानं सुमारे 3 तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली. तसंच ‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केलं.

या दरम्यान संतप्त जमावाकडून काही हिंसक प्रतिक्रिया देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जमावातील काही तरुणांनी परिसरातील दुकाने बंद पाडली. तसंच लक्ष्मीपुरी आणि परिसरातील हातगाड्या उलटविल्या, काही दुकानांवर दगडफेक झाली. जमाव दुकाने बंद करण्याची मागणी करत या परिसरातून फिरत होता. त्यामुळे काही काळ दुकाने बंद राहिली. यावेळी चिमासाहेब चौकातील काही हातगाड्यांवरील साहित्य संतप्त जमावाने फेकून दिले.  त्यानंतर टाऊन हॉलमागील एका चिकन सेंटरची तोडफोड केली. संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्न पोलिस करत होते, अशी माहिती समोर येत आहे.

या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यांत अचानकपणे औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण होणे हे काही सहज घडलेले नाही. हा योगायोगही नाही. विरोधी पक्षही दंगली घडतील, दंगली घडतील असे वारंवार सांगत आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण योगायोग असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करत आहेत. आम्ही हे प्रकार आजिबात खपवून घेणार नाही, कोल्हापूर प्रकरणात आधिक खोलात जाण्याची गरज आहे, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube