Download App

Sanjay Raut : ईडीने नुसते डोळे वटारले तर पक्षांतर केलं, कुठल्या नोटीसची गोष्ट करता; राऊतांचा टोला

Sanjay Raut on Eknath Shinde : सोमवारी शिवसेना (shivsena) पक्षाचा ५७ वा वर्धापनदिन साजरा झाला. त्यानिमित्त या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम झाले. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होत. ईडीच्या नोटीस वरून निशाणा साधला होता. त्यावरून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Critisize Eknath Shinde on ED Notice )

Ahmednagar Breaking ! बर्थडे पार्टीत घुसून तरुणाची तलवारीने हत्या…

काय म्हणाले संजय राऊत ?

केंद्रीय यंत्रणांकडून द्धव ठाकरेंना नोटीस देण्यात आली होती. तेव्हा ते घाबरले होते. अशी टीका शिंदेंनी केली त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘अरे बाबा, एकनाथ शिंदे यांना नुसते डोळे वटारले ईडी ने आणि ते पळून गेले आणि पक्षांतर केले. हे कोणत्या नोटीसच्या गोष्टी करत आहेत. फक्त त्यांच्या दोन लोकांना घेऊन गेले तर… सगळी कथा तर तुम्हाला माहिती आहे.

Ram Charan: लग्नानंतर ११ वर्षांनी राम चरण अन् उपासना झाले आई-बाबा, घरी गोंडस मुलीचे आगमन

कसली नोटीस आम्हाला नोटीसा आल्या आम्ही बेडरपणे तुरूंगात गेलो. आम्ही गद्दारी नाही केली. ज्यांनी गद्दारी करायची होती. त्यांनी केली. आम्ही आहोत ना आमच्या पक्षामध्ये तुरूंगवास भोगला, संघर्ष केला त्रास सहन केला. तुमच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळकुटे आहोत का? सचिन जोशीला का उचलल होतं? अधी हे ईडीला विचारा. असं प्रतिउत्तार संजय राऊतांनी कालच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाकरेंवरील टीकेला दिलं आहे.’

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

शनिवारी कार्यकर्त्यांच्या मोळाव्यात उद्धव ठाकरेंनी मोदी- शाह यांच्यावर टीका केली होती. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, ‘कालच्या भाषणात मोदी- शाह यांच्यावर टीका केली. पण ते कुठं तुम्ही कुठं. एक नोटीस आली, तेव्हा xxx पातळ झाली होती. त्यामुळे मर्यादेत रहा. जेव्हा मोदींना भेटायला गेले तेव्हा शिष्टमंडळ बाहेर ठेवलं आणि शिष्टाई आतमध्ये गेली. आम्हाला सर्व माहिती आहे.’ अशी टीका यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केली होती.

Tags

follow us