Ram Charan: लग्नानंतर ११ वर्षांनी राम चरण अन् उपासना झाले आई-बाबा, घरी गोंडस मुलीचे आगमन

Ram Charan: लग्नानंतर ११ वर्षांनी राम चरण अन् उपासना झाले आई-बाबा, घरी गोंडस मुलीचे आगमन

Ram Charan Upasana : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि उपासना (Upasana) यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झालं आहे. हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपासनाला दाखल करण्यात आले होते. आता हॉस्पिटलने मुडिकल बुलेटीनच्या माध्यमातून २० जून २०२३ रोजी राम चरण आणि उपासनाला मुलगी झाल्याचे जाहीर केले आहे. ‘आरआरआर’ फेम दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण लग्नाच्या 11 वर्षांनंतर राम चरण आणि उपासना आई-बाबा झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@ram_konidela)


अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. उपासनाने 20 जून 2023 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उपासनाला सोमवारी हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता आज तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राम चरण आणि उपासना आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरत आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून राम चरण आणि उपासनाला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत.

तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांना कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत.  राम चरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. यानंतर गेल्यावर्षी राम चरणने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्याने लिहिले होते की,”राम चरण आणि उपासना आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. तुम्हाला ही बातमी सांगत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तुमचं प्रेम असेच कायम राहुद्या”.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

2023 हे वर्ष राम चरणसाठी खूपच खास ठरला आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाचा राम चरणला ‘आरआरआर’ (RRR) सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. राम चरणचा ‘द इंडिया हाऊस’ (The India House) हा सिनेमा लवकरच चाहत्यांचा  भेटीला येणार आहे. तसेच त्याचा ‘गेम चेंजर’ हा सिनेमा देखील चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube