Download App

Sanjay Raut यांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश; ‘हे’ आहे कारण…

Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मालेगाव कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याच कारण म्हणजे ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राचे संजय राऊत हे संपादक आहेत. त्यात राऊत यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात बादनामीकारक आणि चुकीचा मजकूर छापला होता. त्यावर भुसेंकडून मानहानी अर्ज दाखल करण्यात आला होता.

दादा भुसेंविरोधात बादनामीकारक आणि चुकीचा मजकूर…

सामनामध्ये छापण्यात आले होते की, गिरणा सहकारी साखर कारखान्याच मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटा रूपायांचा शेअर्स घोटाळा केला आहे. त्यावरून राज्यातील राजकारणा देखील तापले होते. त्यानंतर त्यावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून मानहानी अर्ज दाखल करण्यात आला होता. मालेगावच्या मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.

Air Quality : मुंबई-पुणेच नाही तर राज्यासाठी धोक्याची घंटा; अनेक शहरांची हवा गुणवत्ता खालावली

त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांना मालेगाव कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राऊत स्वतः न्यायालयात हजर राहतात की, वकिला मार्फत आपले म्हणणे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर राऊतांविरोधात पुरावा म्हणून भुसे यांना सामनातील लेख न्यायालयात सादर केला आहे.

Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची परिस्थिती…

दरम्यान गिरणाच्या प्रकरणानंतर ससूनमधील हॉस्पिटलमधील (Sasoon Hospital Drug Racket) ड्रग्ज विक्री व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरू लागले आहेत. या प्रकरणानंतर संजय राऊत यांनी दादा भुसेंवर टीका केली होती. कारण या प्रकणाचे धागेदोरे भुसेंच्या नाशिकमध्ये आढळून आले आहेत.

Tags

follow us