Sanjay Raut is Mahavikas Aghadi’s ‘Gautami Patil’, criticism of Nitesh Rane : राणे आणि शिवसेनेचा ठाकरे गटात नेहमीच वाद होत असतात. राणेंकडून कायम ठाकरे गटावर टीकेची तोफ डागली जात असते. त्या टीकेला त्याच तोडीचं प्रत्युत्तर ठाकरे गटाकडून दिलं जातं. गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) कायम ठाकरे गटावर निशाणा साधतांना दिसत आहेत. आताही त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी टीका करतांना राऊतांची तुलना प्रसिध्द नृत्यंगणा गौतमी पााटीलशी (Gautami Patil) केली आहे.
सध्या गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आहेत. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलतांना नितेश राणेंनी संजय राऊतांना गौतमी पाटीलची उपमा दिली. राणे म्हणाले, संजय राऊत हे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. गौतमीला पाहायला जशी लोकांची गर्दी होते, तसं राऊतांना वाटते की, लोक आपल्याला पाहण्यासाठी चॅनल सुरू करतात. पण, त्यांचा हा गैरसमज दूर व्हायला हवा. गौतमी पाटील यांनी राऊत यांना मेकअपचे सामान पाठवावे, अशी विनंती मी करणार आहे, तर आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचं वाकून हे मविआच्या गौतमी पाटीले करू नये, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली.
Ahmednagar Politics : भाजपाच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे ‘जमिनीवरच’
काल गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर सातप्न वागणूक दिली जाते, अशी टीका केली होती. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली की, कीर्तिकर हे आमचे जवळचे सहकारी होते, त्यांनी सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायी होतं. मात्र, ते आज जे बोलतात ते आम्ही यापूर्वी बोललो, अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर नितेश राणेंनी भाष्य केलं. गजानन कीर्तिकर यांच्यावर राऊतांचं प्रेम ऊतू जातंय. मात्र, त्यावेळी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी तासन् तास बसायचे. मात्र ठाकरेंसोबत बैठक होत नाही. आज मात्र राऊत किर्तीकरांबद्दल भरपूर बोलत आहेत. राऊत तुम्ही गजानन कीर्तिकरांची अजिबात काळजी करू नका. ते हाडामासाचे कार्यकर्ते आहेत. ते तुमच्यासारखे नाहीत, असं राणे म्हणाले.
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या आमदारांना कमीत कमी निधी मिळत असे. आणि आता राऊत भाजपबद्दल बोलत आहेत. फडणवीस उद्धव ठाकरेंना जेवढा आदर देत असत, तेवढा आदर उद्धव ठाकरेंच्या भावाने केला नाही. हे सर्व सहन करूनही उद्धव ठाकरे राऊतांना सोडत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करत असल्याची टीका राणेंनी केली.
दरम्यान, नितेश राणेंनी केलेल्या टीकेला राऊत काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.