Download App

संजय राऊत मानसिक तणावात म्हणून ते शिव्या देतायत…

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पुन्हा एकदा अपशब्द वापरले आहे. तसेच राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत बोलताना देखील अपशब्दांचा वापर केला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य करताना त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे वैफल्य आहे, नैराश्य आहे, जेव्हा बोलण्यास शब्द कमी पडतात तेव्हाच ते शिव्या व मारामारीची भाषा करतात अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊतांना शाब्दिक टोला लगावला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहे. तसेच राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामधील नेत्यांमध्ये देखील शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना अपशब्दांचा प्रयोग केला होता. यावर भाष्य करताना भाजपनेते आशिष शेलार यांनी राऊतांना खडेबोल देखील सुनावले आहे.

संजय राऊत मानसिक तणावात म्हणून ते शिव्या देतायत…

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, ज्यांच्याकडे नैराश्य आहे, वैफल्य आहे, ज्यांना आपली बाजू मांडण्यामध्ये तर्क कमी पडतात, संवाद कमी पडतो, शब्द कमी पडतात तेव्हा शिव्या आणि मारामारीचे भाषा केली जाते. ज्यापद्धतीने सातत्याने संजय राऊत वक्तव्य करत आहे त्याचा अर्थ ते नैराश्यात आहे, ते मानसिक तणावात आहे, त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी उचित शब्द सुचत नाही आहे. म्हणूनच संजय राऊत हे शिव्यांचा वापर करत आहे. संजय राऊत हे निवडणूक आयोगाला शिवीगाळ करत आहे. याप्रकरणाची सभागृहाचे अध्यक्षांनी नोंद घ्यावी तसेच त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मी केली असल्याचे यावेळी शेलार यांनी म्हंटले आहे.

पुण्यात नाही चालले खोके, भाजपच्या तंत्राला पुणेकरांचे उत्तर; जितेंद्र आव्हडांचे खास स्टाइलने आभार

तसेच पुढे बोलताना शेलार म्हणाले, अशा प्रकारे व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करून व्यवस्थेवर शिवीगाळ करणे तसेच सामान्य जनतेला व्यवस्थांविरोधात भडकावणे हा देखील एक प्रकारचा गुन्हा होऊ शकतो याबाबतची सविस्तर माहिती मी सभागृहात दिली असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहे.

Tags

follow us