Download App

पद्मविभूषण पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंना का नाही ? यादवांच्या पुरस्कारावर राऊतांचा आक्षेप

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना दिलेल्या पद्मविभूषण सन्मानावर आक्षेप घेत बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर (Central Govt) टीका केली आहे. मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्याच्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने राम मंदिर बाबत भूमिका घेतील. त्यावर आमचा आक्षेप आहे विरोध आहे. बाकी मुलायम सिंह यादव हे मोठे नेते आहे. आयोध्या मधील जे कांड झाले त्याबाबत आमचा मुलायम सिंह यादव यांना विरोध आहे. त्यावेळी भाजप यांनी उल्लेख हत्यार असे केले. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार यावेळी का केला नाही ? बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बाबरी बाबत कडवट भूमिका घेतली होती.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तुम्ही ते चित्र लावले आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार, अशा पिपाण्या वाजून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावरती बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचे सरकार करत आहे का? हे पाहावे लागेल.

कारसेवकांवर मुलायमसिंह यांच्या समर्थकांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. भाजपाने तेव्हा त्यांचा उल्लेख हिंदूंचा हत्यारा असा केला. मुलायम सिंह यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. आता त्यांनाच पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलंय. भाजपा आपल्या विचारात हळूहळू बदल करतेय, असं संजय राऊत म्हणाले.

जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्वे असतात, तेव्हा त्यांना हवे असतात. राष्ट्रीय सर्वे हा भाजपच्या बाजूने आहे. हा त्यांना हवा आहे, मात्र महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्या विरोधात आहे. म्हणून त्यांना नको वाटत आहे. त्या सर्वेनुसार लोकसभेत 34 जागा मिळतील, असा अनुमान आहे. महाविकास आघाडीला मात्र आम्ही म्हणत आहे. या जागा साधारण 40 ते 45 महाविकास आघाडीला असतील. मुख्यमंत्र्यांना वाटतं चार पाच जागा मिळाल्या, तरी पुरे, माझा असं म्हणणं आहे.

वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत जाण्याविषयी प्रस्ताव आला नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांचं म्हणणं खरं आहे. अजूनही महाविकास आघाडी म्हणून वंचित बरोबर युती झाली नाही. चर्चा फक्त वंचित आणि शिवसेनेसोबतच झाली आहे, त्यामुळे शरद पवार जे बोलत आहेत ते बरोबर आहे.असं ते म्हणाले.

Tags

follow us