Sanjay Raut on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू नये. इंडिया आघाडीने त्यांना संजोजक सुद्धा केलं नाही, अशा शब्दात त्यांनी नितिश कुमार यांना डिवचलं होतं. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून इंडिया आघाडीची गाडी पुढं न सरकल्यानं नितीशकुमार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. या सर्व घडामोडीनंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
‘पुणे-मुंबई’ प्रवास 21 मिनिटात तुर्तास स्वप्नवतच! फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला नीती आयोगाचा ब्रेक
आज माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले की, काही लोकांना इंडिया अलायन्सची फार चिंता वाटत आहे. इंडिया अलायन्सचं अत्यंत ठीक चाललेलं आहे. आमच्या चिंता पंतप्रधान मोदींनी आणि अमित शाह यांनी करण्याची गरज नाही. अमित शाह यांनी पाच राज्याच्या निवडणूकीवर लक्ष ठेवावं. अनेक राज्यात विरोधकांना भाजपला धुळ चारली आहे. . प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष हरण्याच्या परिस्थितीत आहे. आता पाच राज्यात तुमचा पराभव इंडिया अलायन्स करेल. त्यामुळं अमित शाह यांनी स्वतःच्या घरात पहावं, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, इंडिया आघाडीनं काय करावं आणि काय नाही, हे ठरवायला आम्ही समर्थ आहेत. नितीश कुमार इंडिया अलायनस्चे मोठे नेते आहेत. ओबम अब्दुला, उध्दव ठाकरे, अखिलेश यादव यांचं स्थान फार मोठं आहे. सगळे एक दुसऱ्यांच्या संपविधानसभा निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा एकत्र भेटणार आहोत.
इंडिया आघाडीची जन्म झाल्यासान भाजपची झोप उडाली आहे. ‘इंडिया आडाडीचा धसका भाजपने घेतला आहे. मोदी आणि त्यांचे लोक आता इंडियाचं नाव आता भारत करायला लागला आहात, असा टोलाही त्यांनी लगावाला.
ओमर अब्दुल्ला आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीवर भाष्य केले. सध्या इंडिया आघाडीची स्थिती मजबूत नाही, असं अब्दुल्ला म्हणाले तर नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीपेक्षा काँग्रेसला निवडणुकीत जास्त रस असल्याचं विधान केलं. याबाबत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, नितीश कुमार यांचे वक्तव्य चुकीचे नाही, मात्र त्यांनी वास्तव नाकारू नये. इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्षाला निवडणुकांमध्येच रस असावा. आम्ही राजकारणात आहोत आणि दिल्लीच्या सत्तेचा पाया बळकट करायचे असेल तर विधानसभा निवडणुका जिंकून पाचही राज्ये काबीज करावी लागतील. त्यामुळं काँग्रेस जर निवडणुकीत झोकून देत असेल तर भाजपच्या पराभवासाठी इंडियातील प्रत्येक घटकाने हातभार लावला पाहिजे, असं राऊत म्हणाले.
2004 मध्ये एकाधिकारशाहीचा, जनतेविरोधी सरकारचा आम्ही नक्कीच पराभव करू, असंही राऊत म्हणाले.