Download App

Sanjay Raut : बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं होतं. त्यामुळं ठाकरे सरकार अल्पमतात आलं होतं. शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गटावर विरोधकांकडून गद्दार अशी टीका केली जाते. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्रि आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) गेले. या दौऱ्यात त्यांना प्रचंड सुरक्षा दिली गेली. आता याच सुरक्षेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली. जनता या गद्दारांना पकडून चोप देईल, अशी भीती असल्यानं त्यांनी ही सुरक्षा देण्यात आली आहे, असं राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही आहे. कारण, बाळासाहेब ठाकरे हे गद्दार आणि बेईमान लोकांच्या विरोधात होते. मग ते गद्दार लोक हे देशाचे असो, किंवा पक्षाचे असो. बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे, हे बाळासाहेबांचे विचार होते. ते आयुष्यभर गद्दार लोकांच्या विरोधात बोलत राहिले. आणि आता हाच बाळासाहेबांचा आदेश आता राज्यातील जनता अंंमलातून आणून पालन करेल, अशी भीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 40 गद्दारांना आहे, जनता आपल्याला भर रस्तात चोप देईल, असं वाटत असल्यानं त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे, अशी टीका राऊत यांनी केले.
मृतांच्या कुटूंबियांना तातडीने मदत करावी, अजित पवारांची सरकारकडे मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसह सगळे विरोधक हे ईव्हीएम मशीनला विरोध करत आहेत. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माझा ईव्हीएमवर विश्वास आहे, असं सांगितलं. याविषयी बोलतांना राऊत म्हणाले. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत एक मिटींग झाली. ही मिटींग ईव्हीएम संदर्भात होती. अजित पवार हे महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते असून आमचे सहकारी आहेत. ईव्हीएमवर अजित पवारांचा विश्वास असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. देशातील जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही. ईव्हीएम मशीनवर केवळ अंध भक्तांचा विश्वास आहे. त्यामुळं अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असं मला वाटत नाही, अशा शब्दात राऊतांना अजित पवारांवर खोटक टोला लगावला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना योग्य वेळ आल्यवर भारतरत्न देऊ असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, याबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, सही समय कब आएगा, चुनाव के पहले, या चुनाव के बाद…. तुमचं सरकार येऊन आठ वर्ष झाले. आमची सुरूवातीपासून ही मागणी आहे. पण, तुमचं सरकार असतांनाही तुम्ही सावरकरांना भारतरत्न दिला नाही, अशी टीका राऊतांना केला.

Tags

follow us