Download App

Sanjay Raut : 15 दिवसांत सरकार कोसळणार; दिल्लीत पडद्यामागे…

Sanjay Raut On Eknath Shinde :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा दावा केला आहे. लवकरच राज्यतील मुख्यमंत्री बदलले जाणार असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणर असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर आता राऊतांनी केलेल्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. येत्या 15 दिवसांमध्ये राज्यतील मुख्यमंत्री बदलणार आहे. मुख्यमंत्री बदलणे म्हणजेच सरकार बदलणे होय. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री  बदलाच्या हालचाली सुरु आहेत, असे राऊत म्हणाले आहेत. माझी माहिती आहे की , पडद्यामागे मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री सध्या अस्वस्थ आहे. ते मंत्रालयात जात नाहीत. याबाबत तुम्ही देवेंद्र फडणवीसांना देखील विचारु शकतात, असे ते म्हणाले आहेत.

मविआच्या ऐक्याविषयी संभ्रमात टाकणाऱ्या पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊत म्हणाले, ‘त्यांच्या बोलण्यावरून….’

दरम्यान काल  शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली आहे. यावर देखील राऊतांनी भाष्य केले आहे.

ठाकरे की शिंदे धनुष्यबाण कोणाचा? चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी रद्द

संजय राऊत यांनी सांगितले की, अनेकदा पवारांच्या बोलण्याचा, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. आत्ता या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेत आहोत… तर आम्ही अद्याप एकत्र आहोत हे लोकांना सांगण्यासाठी. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहतील, असं राऊत म्हणाले.

Tags

follow us