मविआच्या ऐक्याविषयी संभ्रमात टाकणाऱ्या पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊत म्हणाले, ‘त्यांच्या बोलण्यावरून….’
Sometimes Pawar’s words and statements are misinterpreted : पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक (Lok Sabha and Legislative Assembly Elections) आहे. या निवडणुकांसाटी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातारवण निर्मिती करत आहे. हे तीनही पक्ष करत आहेत. अशातच काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विचारांध्ये ऐक्यता नसल्याचं समोर आलं. त्यामुळं पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची चर्चा जोर धरु लागली. काल अमरावती इथं शरद पवारांना प्रसारमाध्यमांनी मविआच्या ऐक्याविषयी प्रश्न विचारेल. तेव्हा पवारांनी सांगितलं की, आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे. पण, फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत, यावर अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळं यावर आत्ताच मविआच्या ऐक्याविषयी बोलणं योग्य नाही, असं पवार म्हणाले. आधीच मविआ त्यांच्या ऐक्याविषयी संभ्रम निर्माण झाला असतांना पवारंच्या विधानामुळं आता पुन्हा राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं.
MPSC चा मोठा निर्णय, पहिल्यांदाच मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार
दरम्यान, संजय राऊत यांनी सांगितले की, अनेकदा पवारांच्या बोलण्याचा, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. आत्ता या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेत आहोत… तर आम्ही अद्याप एकत्र आहोत हे लोकांना सांगण्यासाठी. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहतील, असं राऊत म्हणाले.
ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा मोठा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्व यात फार आहे. ते महत्व कायम राहणार आहे. त्यांची भूमिका आहे की, महाविकास आघातील तीनही पक्ष एकत्र राहिले, तर 2024 च्या निवडणुकीत आपण भाजपचा पराभव करू शकू, लोकसभेतही भाजपला धोबीपछाड करू. त्यामुळं महाविकास आघाडीच्या संदर्भात पवारांची एकत्र न लढण्याची भूमिका असेल, असं मला वाटतं नाही. आम्ही सगळेच सातत्याने त्यांचाशी चर्चा करत असतो. आत्ताही मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्या बोलण्यावरून महाविकास आघाडी तुटावी, असं मला वाटत नाही, असं राऊतांनी सांगितले.