Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे अमित शाह भेटीवर प्रतिक्रिया दिली.
ऐन निवडणुकीत ज्योती मेटेंची अडचण… शासकीय नोकरीचा राजीनामा सरकारकडून ‘वेटिंगवर’
आज माध्यमांशी बोलतांना संजय राऊतांना राज ठाकरे-अमित शाह भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आणि उत्तम कलाकार आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. मला त्यांच्या भावना आणि खंत इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा मला जास्त माहिती आहे. मोदी-शहांच्या हातून या देशाचे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक फासावर टांगलं जात असल्याचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढलं होतं. मला ते खूप आवडलं होतं. मी यात राजकाऱण पाहत नाही. राज ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रातून महाराष्ट्रातील जनतेची भावना पाहायला मिळाली होती. राज ठाकरे यांनी काल अमित शहा यांची भेट घेतली. त्या भेटीत राज ठाकरेंनी तिथे यावर नक्कीच चर्चा केली असेल, असं राऊत म्हणाले.
ISRO Award : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; ISRO ला अवकाश क्षेत्रातला मानाचा पुरस्कार
पुढं बोलतांना राऊत म्हणाले, आपण अनेकदा पुलवामा हत्याकांडाबद्दल बोलतो, त्याचा विचार करतो आणि त्याबद्दलचे दुःख व्यक्त करतो. राज ठाकरे यांनी एका भाषणात पुलवामा हत्याकांडामागचे रहस्य उघडलं होतं. राज ठाकरे म्हणाले होते की, पुलवामा हत्याकांडाच्या आधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या दोघांनी बँकॉकमध्ये गुप्त भेट झाली होती. त्या बैठकीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का? असा सवाल राज ठाकरेंना पडला होता. मला वाटतं कालच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पुलवामा संदर्भात राज ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर दिलं असेल.
आगामी काळात महाविकास आघाडीच्या बैठका होणार असून, त्यानिमित्ताने शरद पवार यांची भेट घेणार आहे. वंचितने सोबत यावे, राजू शेट्टी यांनीही सोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. शाहू महाराज स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार नसून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यांचा आदर आहे, त्यामुळेच उद्धव ठाकरे भेट घेण्यासाठी जाणार आहेत, त्यांचे आशिर्वाद घेऊ, असं राऊत म्हणाले.