Download App

दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut On Shinde Fadnavis Sarkar : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवीनगर (Ahilya Devi Nagar)करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar)यांच्या जयंतीदिनी केली आहे. त्यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार राऊत यांनी अहमदनगरच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा हटवल्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याच सत्ताधाऱ्यांनी अहिल्यादेवींचा पुतळा हटवला होता. त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्याविरुद्ध रोष होता, म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला उपरती झाली आणि त्यांनी अहमदनगरचे अहिल्यादेवीनगर असे नामांतर केल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

खासदार राऊत म्हणाले की, अहिल्यादेवींचं नाव देशात, त्रिखंडात त्यांचं नाव मराठी राज्यकर्त्या म्हणून गाजलं. पण याच अहिल्यादेवींच्या संदर्भात दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील त्यांचा फोटो, पुतळा हटवण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर सरकारला ही उपरती झाली, असा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

अहिल्यादेवींच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो, असंही यावेळी राऊत म्हणाले. अहिल्यादेवी या उत्तम राज्यकर्त्या होत्या, कुशल प्रशासक होत्या, असंही खासदार राऊत म्हणाले.

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन पत्रकारांनी खासदार राऊत यांना प्रश्न केल्यानंतर ते म्हणाले की, ही भूमिका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पाहिजे. ही भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येकानं आपापल्या भूमिका घेतल्या आहेत. महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा ही संपूर्ण देशाची भावना आहे. पण त्यांना न्याय कोण नाकारतंय, पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार त्यांना न्याय नाकारतंय हे लक्षात घेतलं पाहिजे.

त्याचवेळी गजानन किर्तीकर यांच्या घुमजाववरुन खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, गजानन किर्तिकर असं म्हणाले आहेत की, आम्हाला सापत्न, सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, एनडीएमध्ये आम्हाला मान-सन्मान मिळत नाही. आम्हाल घटक पक्षाचा दर्जा नाही, असं गजानन किर्तिकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं म्हणणं आहे.

आता आमच्याकडे ते ज्येष्ठ नक्कीच होते, पण तिकडं त्या गटामध्ये ते ज्येष्ठ आहेत की नाही हे मला माहित नाही असा टोलाही संजय राऊत यांनी गजानन किर्तिकर यांना लगावला आहे. पण आता त्यांनी घुमजाव केला आहे असं तुम्ही म्हणताय तर त्यांच्यावर दबाव असण्याची शक्यता आहे, असंही यावेळी खासदार राऊत म्हणाले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरुन पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला, त्यावर राऊत म्हणाले की, आम्ही त्याच्याकडे काय पाहणार, त्या भाजपमध्ये आहेत पण त्यांना भाजप आपलं मानत नाही, असं त्यांना म्हणायचंय. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप उभा राहण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला अच्छे दिवस दाखवले.

मुंडे असतील, खडसे असतील, भाऊसाहेब फुंडकर होते, महादेवराव शिवणकर होते, असे अनेक नेते बहुजन समाजातले नेते होते, त्यांनी या महाराष्ट्रामध्ये भाजप शुन्यातून निर्माण केला. शिवसेनेसोबत युती केली आणि हा पक्ष सत्ताधारी पक्ष केला. त्या मुंडे परिवाराचं अस्तित्व या राजकारणात राहू नये यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरु असल्याचं सर्वांना माहित आहे, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

Tags

follow us