Sanjay Raut On Shrikant Shinde : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये कोणत्यानाकोणत्या मुद्यावरून नेहमी वाक्य युद्ध होत असते. शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्यावर टीका करण्याची एक पण संधी सोडत नाही. रोज पत्रकार परिषद घेऊन राऊत शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असतात. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदेबाबत प्रश्न केला तेव्हा राऊत त्यांचं नाव एकताच ऑन कॅमेरा थुंकले.
शिंदेंच नाव एकताच संजय राऊत थुंकले, असे काय घडले!#sanjayraut #shrikantshinde pic.twitter.com/pKehkqH6ls
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 2, 2023
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विरोधांवर हल्ला चढवला यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले विरोधकांनी आमच्या जागा वाटपाची चिंता करू नये. महाविकास आघाडीतील लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप हे सुरळीतपणे पार पडेल एकत्र बसून त्याच्यावर चर्चा होईल प्रत्येक जागेवर चर्चा होईल. विधानसभेच्या जागावाटप देखील त्याच पद्धतीने होईल आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाही, वज्रमुठ कायम राहील.
पुढे शरद पवार व मुख्यमंत्री यांच्या भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले…शरद पवार हे त्यांच्या एका कार्यक्रमासाठीच आमंत्रण द्यायला मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. त्यात राजकारण काय? राज्याच्या दुर्दैवाने मुख्यमंत्री पदावर एक व्यक्ती बसलेली आहे तो त्या पदाचा मान आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी ते गेले. त्यांचा सिंहासन लवकरच हलणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती एखादा नेता मुख्यमंत्र्यांना भेटला तर चुकीचं काय, आम्ही सुद्धा निवेदन देत असतो. जोपर्यंत ते खुर्चीवर बसले आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे प्रश्न मांडत राहणार असे म्हणता राऊतांनी यावेळी मुख्यमत्र्यांवर टीका केली.
उद्या शिरुरमधून अजित पवारही इच्छुक असेल, तुम्हाला काय त्रास? अजितदादांचा सवाल
आज तिथीनुसार रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या बाबत बलताना राऊत म्हणतात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण हे राज्य चालवतो. हा सोहळा उत्तम प्रकारे करणे हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे.
महाराजांच्या संदर्भात जेवढा अभ्यास करायचा तेवढा थोडा आहे. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना समान स्थान होतं. छत्रपतींनी सर्वांवर विश्वास ठेवला आणि राज्य घडवलं. मोहन भागवतांना नवीन व्याख्या सापडली असेल, सध्या इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. असे राऊत मोहन भगवंतांबाबत म्हणाले.
शेवटी सामन्यातील अग्रलेखाबद्दल बोलताना राऊत म्हणतात राहुल गांधींनी जसं म्हटलं आहे सगळ्या विरोधकांचा मानसन्मान राखून पुढे जाऊ याला मीपणा बाजूला ठेवणं म्हणतात. भाजपच्या नेत्यांकडे मी पणा आहे रावणाचा पराभव हा मी पणाने केला. तसाच पराभव हा मी पणा भाजपचा करणार