Download App

मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut Said The present Chief Minister will be disissed : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठा दावा केला होता. दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं राऊत म्हणाले होते. त्यामुळं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सीएमपदावरून पायउतार होण्याच्या चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, आज सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार ते पाहायचे आहे, अशी टोलेबाजी करण्यात आली.

सामना अग्रलेखात लिहिलं की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भलताच खेळखंडोबा सुरूआहे. राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही, पण राज्यातला मुख्यमंत्री तरी आहे की नाही, असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्रीपदावर जोर चर्चा झडत आहेत. मुख्यमंत्री पद रिकामं नाही, हे खरं आहे. पण, रिकामपणाचे उद्योग जोर धरू लागले आहे. एका कार्यक्रमाल अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारला गेला. ते म्हणाले, २०२४ ला काय आत्ताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मुला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, हे सांगणं गैर नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कधीपासून मुख्यमंत्री व्हायचं आहे. विखे यांना अजित पवारांविषयी विचारलं असता त्यांचा सूर वेगळाच होता. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असं सागून त्यांनी शिंदे-मिंधे गटाचे कपडे उतरवले, अशी शिंद गटावर टीका केली.

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी…

विखे पाटील यांच्या पुढं १०० पावलं फडणवीस गेले. आणि हळूच म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचे काय कोणीही इच्छा बाळगू शकतो. पण योग्यता हवी ना? फडणवीस यांनी हे वक्तव्य हसत केल. मात्र, त्यात वैफल्या आणि त्रागा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा त्रागा सवती मत्सराचा आहे. भर मंडपात वरमाला तयार असतांना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीच जे घडवले गेले, ते त्यातून अद्याप सावरलेले दिसत नाही, अस टोला फडणवीसांना लगावला.

मुख्यमंत्रीपदासाठी कधी विखे पाटील यांचे तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते. त्या दुखाने फडणवीस हे बेजार झाले असून हे दु:ख त्यांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परमोच्च अवस्थेला पोहोचले आहे. ही अवस्था म्हणजे, बेधुंद नशेचे शेवटचे टोक आहे. दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार ते पाहायचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधीही माजले नव्हते, अशा शब्दात भाजप आणि सीएम शिंदेवर ताशेरे ओढले.

 

Tags

follow us