Sanjay Raut News : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडाडून टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘कोश्यारी खोटे बोलत आहेत. कॅबिनेटने एखादी शिफारस केली असेल तर 72 तासांच्या आत मंजूर करायची असते. कॅबिनेटची मंजुरी करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. यावर त्यांनी बोलावे उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी करू नये. मंडळाच्या शिफारसी त्यांनी मान्य का केल्या नाहीत, याचे उत्तर द्यावे’ असे राऊत म्हणाले.
याआधी कोश्यारी म्हणाले होते, की ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते पाच पानी पत्र पाठवले नसते तर मी दुसऱ्याच दिवशी 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसींवर सही करणार होतो.’ राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या मुद्यावर प्रत्युत्तर दिले.
हे वाचा : Sanjay Raut ना ‘ते’ वक्तव्य भोवणार ? ; शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांने दिला इशारा
राऊत पुढे म्हणाले, की ‘सर्व यंत्रणा गुलाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) हा आशेचा शेवटचा किरण आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) बाबतीत जो निर्णय देण्यात आलेला आहे तो अन्यायकारक निर्णय आहे. महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवर अन्याय करणारा हा निर्णय आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालय हा या देशातल्या जनतेसाठी लोकशाहीसाठी शेवटचा आशेचा किरण आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.’
‘आम्हाला खात्री आहे मुख्य न्यायाधीश खंडपीठ सर्वोच्च न्यायालय या देशात लोकशाहीच्या संदर्भात काय चाललंय याचा विचार करून वाचविण्याचा निर्णय घेतील. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय हा सरळ सरळ ही शिवसेना आणि चिन्ह हा सत्ता आणि पैसा या माध्यमातून मिळवलेला निर्णय आहे.’
Sanjay Raut : नगरसेवक, आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठीही ठरला रेट; राऊतांनी आकडाच सांगितला
‘2 हजार कोटींचा पॅकेज गेल्या पाच महिन्यांमध्ये यासाठी वापरण्यात आलं. मी पुन्हा दोन हजार कोटींचा पॅकेज हा शब्द वापरत आहे. मला याचे काय परिणाम होणार याची पूर्ण कल्पना आहे. म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तुम्ही कार्यालयांवरती ताबा घ्याल पण लाखो जनता शिवसैनिक जे खवळून उठले आहेत निर्णयावर त्यांना कसे शांत कराल ?,’ असा प्रश्न त्यांनी केला.