Sanjay Raut ना ‘ते’ वक्तव्य भोवणार ? ; शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांने दिला इशारा

Sanjay Raut ना ‘ते’ वक्तव्य भोवणार ? ; शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांने दिला इशारा

Mumbai : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. विशेष करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेत्यांकडून भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. खासदार राऊत (Sanjay Raut) रोज खळबळजनक आरोप करत आहेत. न्यायालयीन लढतीमध्ये पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालये ही सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याची टीका केली होती. त्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांनी त्यांच्या या वक्तव्याची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले होते.

तर आता पुन्हा एकदा त्यांनी संजय राऊत यांना निवडणूक आयोगावर केलेल्या बेजबाबदार वक्तव्याची किंमत चुकवावी लागणार असल्याचेही म्हटले आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटावर आरोप करत 2 हजार कोटींना पक्ष व चिन्ह विकत घेतले असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले की, ‘संजय राऊत यांच्या बोलण्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकालावर आणि न्याय व्यवस्थेवर केलेल्या बेजबाबदार वक्तव्याची किंमत त्यांना लवकरच चुकवावी लागणार’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : शिवसेना नावासह धनुष्यबाणासाठी 2 हजार कोटींचा सौदा

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही शिंदे गटाची बाजू घेत त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले, अशी टीका केली होती. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनीही शिंदे गट व भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. अमित शहा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत असतानाच देसाई म्हणाले, की अमित शहा जे बोलले असतील ते त्यांचे मत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आम्ही सांगतो आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा विचार सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दावणीला बांधला. आणि ते सोडविण्यासाठी आम्ही सहा महिन्यांपूर्वी प्रयत्न केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube