Download App

डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेत येऊ, तेव्हा…राऊतांनी दिला इशारा

मुंबई : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. त्यांच्या चौकश्या केल्या जात आहे. असे आजवर राज्यात कधीही झाले नाही. मात्र सत्ताधाऱ्यांचा हाच डाव एकदा का उलटला तर आम्ही सत्तेत येऊ मग याची उत्तरे त्यांना द्यावी लागणार अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, गृहमंत्र्यांचे अस्तित्वच दिसत नाही. त्यांचे अस्तित्व केवळ विरोधी पक्षातील नेते मंडळींवर खटले दाखल करण्याचे आदेश देण्याएवढेच दिसत आहे. तेही सध्या मुख्यमंत्री करत आहे.

आजही विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे खटले दाखल करणे, गुन्हे दाखल करणे, तसेच त्यांच्या जुन्या केसेस उकरून काढणे व नव्याने गुन्हे दाखल करणे आदी प्रकार सध्या राज्यात सुरु आहे. मात्र एकदाका तुमचा डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी तुम्हाला या सर्व गोष्टींची उत्तरे द्यावी लागणार आहे. खासकरून पोलीस प्रशासनाला याबाबतची उत्तरे द्यावी लागणार आहे.

महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी दंगली, मात्र सभा होणारच…

मुख्यमंत्र्यांच्या काळात दंगली नाही झाल्या
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत? विनाकारण छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल झाली. दंगल घडवून आणली जात आहे. सरकारकडून या दंगली घडवून आणल्या जात आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच हिंदू – मुस्लिम जातीय दंगली घडवून आणल्या जात आहे.

आमचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना दंगली नाही झाल्या. मात्र गुजरात मध्ये भाजपचं सरकार असताना देखील दंगल झाली. त्यानंतर आता राज्यात त्यांचीच सत्ता असताना देखील दंगल होतेय याचा अर्थ सरकार स्वतः दंगली घडवून आणत आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

Tags

follow us