Download App

90 दिवसांत संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार, नितेश राणेंचा दावा

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane on Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यावरुन ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. यावरुन भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढील तीन महिन्यात संजय राऊत जेलमध्ये जातील असा इशारा त्यांनी दिला आहे.

नितेश राणे म्हणाले की भाजपाच्या नेत्यांना धमक्या दिल्या तर आम्ही गप्प बसणार नाही. धमकी देण्याचे दिवस गेलेत. जे काही योग्य वयातंच तेच अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. नियमांत कायद्याच्या चौकटीत आहे तेच करणार आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयात तीन महिन्यांताच निर्णय घ्या असे आदेश आलेले नाहीत. कायद्याच्या अनुसारांतच निर्णय घेतले, तुला काय कारायंच ते कर, असा ऐकेरी उल्लेख करत त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.

मी बेट लावून सांगतो की पुढच्या तीन महिन्यांत हा जेलमध्ये जातो की नाही पाहा. तीन महिन्यांनंतर हा तुम्हाला बाहेर दिसणार नाही. पत्राचाळच्या केसमध्ये आरोप निश्चित झालेला आहे. आता हा 90 दिवसांचा मेहमान आहे. 90 दिवसांनी हा तुरुंगात दिसणार, असा दावाही नितेश राणेंनी केला आहे.

.. म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मदतीने धडा शिकवला; शिरसाटांनी सांगितला ‘तो’ किस्सा

संजय राऊतांना सरकार पाडायंच होतं आणि स्वत: मुख्यमंत्री व्हायंच होतं. 2019 पासून उद्धव ठाकरेंच्या पदाला सुरुंग लावण्यांच काम करत होता. ज्या खुर्चीवर याचा डोळा होता त्या खुर्चीवर पवार साहेबांनी ठाकरेंना बसवलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या खुर्यीच्या खाली टाईमबॉम्ब लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

Tags

follow us