सामनातील अग्रलेख ते नागपूर सभेतील अजितदादांचे भाषण, संजय राऊत थेट बोलले

Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपात (BJP) प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांनी या चर्चेंना माध्यमांना जबाबदार धरले आहे. पण सामनातून अजित पवारांच्या प्रवेशावर मोठे भाष्य करण्यात आले होते. याबद्दल आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. […]

Untitled Design (9)

Untitled Design (9)

Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपात (BJP) प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांनी या चर्चेंना माध्यमांना जबाबदार धरले आहे. पण सामनातून अजित पवारांच्या प्रवेशावर मोठे भाष्य करण्यात आले होते. याबद्दल आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत. आमच्यासारखे काही नेते महाविकास आघाडीचे चौकीदार आहेत. आमच्या आघाडीत कोणी घुसखोरी करु नये यासाठी आम्ही दक्ष असतो. शिवसेना तोडली त्यावेळी महाविकास आघाडीला देखील हादरा होता. त्यामुळे सरकार पडले. आमचा पक्ष तोडला हे बेकायदेशीर आहे, चुकीचे आहे अशी भूमिका पवारसाहेबांनी घेतली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली, अजित पवारांनी घेतली होती. त्यावेळी तर ते आमचे प्रवक्ते नव्हते. पण आपण एकत्र आहोत, संकटात एकमेकांचा हात पकडला पाहिजे अशी आमची भूमिका राहिली आहे. तेच संकट राष्ट्रवादीवर येतंय असं दिसलं. मीच नाही तर शरद पवारसाहेब देखील बोलले होते. शिवसेना फोडली त्यावेळी पवारसाहेबांनी देशाच्या गृहमंत्र्यांना परखडपणे पत्रे लिहिले होते, असे संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

सचिन पायलटला मोठा झटका, काँग्रेसने केले ‘या’ यादीतून बाहेर

ते पुढं म्हणाले की, अजित पवार यांच्याविषयी वावड्या उठत आहेत. असे सामनाच्या आग्रलेखात लिहिले होते पण सामनात आग्रलेख लिहिण्याअगोदर चर्चा सुरु होत्या. त्या वावड्या थांबवल्या पाहिजेत असं लिहिले होते. ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. नागपूरच्या सभेत भाषण केलं पाहिजे. लोक तुमची भूमिका ऐकायला आले आहेत, असं मी त्यांना सांगितले होतं. आम्ही विमानात एकत्र होतो. त्या लेखावर आम्ही चर्चा केली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

अजित पवार कुठं जाणार नाहीत हे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण अगोदर बोलले होते. मी देखील त्यावेळी हेच म्हणालो की अजित पवार कुठं जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले. माझ्यात आणि पवारसाहेबांत जे संभाषण झाले त्यावर पवारसाहेबांनी काही आक्षेप घेतला नाही. मी जे बोललो ते चुकीचे आहे, असे त्यांनी कधी म्हटले नाही. विरोधी पक्षांतील नेत्यांवर ईडी आणि सीबीआयचा फास आवळला जातोय. हे पक्षीय नाही. देशातील प्रमुख नेते हेच सांगत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Exit mobile version