Sanjay Shirsat On Aditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)आगामी निवडणुकीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे. सध्या ठाकरे गटाकडे 16 आमदार आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीत या आमदारांची संख्या 160 होईल, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्याचा आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार समाचार घेतला. ठाकरे गटाला निवडणुकीत उभं राहायला 160 तरी मिळाले पाहिजेत, अशा शब्दात खिल्ली उडवली.
Video : ‘हे प्रदर्शन करु नका…’; शहीद जवानाच्या आईसमोर मंत्र्यांचा लाजिरवाणा पब्लिसीटी स्टंट
आज माध्यमांशी बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटाला निवडणुकीत उभं राहायला 160 उमेदवार तरी मिळाले पाहिजेत. जे आमदार त्यांच्याकडे आहेत, ते आमदार त्यांनी सांभाळून ठेवले पाहिजेत. ते सोळा आमदार कधी जातील हे यांना पण सांगता येणार नाही. आणि त्याची प्रोसेस सुरु झालेली आहे. जेव्हा आम्ही पात्र ठरु आणि ते अपात्र ठरतील तेव्हा ठाकरे गटातील सोळा आमदारांना आमच्या पक्षात आल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
विजय वडेट्टीवारांचा घुमजाव; हिंगोलीतील भुजबळांच्या सभेला जाणार, म्हणाले…
सध्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात राष्ट्रवादी कुणाची यावरून संघर्ष उभा राहिला. त्या संदर्भात निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मला वाटतं अजित दादांनी केलेला उठाव कायदेशीर बाबी पाहता योग्य आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचे अनेक नेते हे आमच्यात फुट नाही, असं सांगतात. हा निकाल अजित दादांच्या बाजूने लागेल असं वाटतं, असं शिरसाट म्हणाले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात वाद सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाला. त्यानंतर अजितदादांचे आजारपण खरे की खोटे याबाबत संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे. मी लेचापेचा माणूनस नाही, गेल्या 15 दिवसांपासून डेंग्यूमुळे आजारी आहे. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, असं ते म्हणाले. याविषयी विचारले असता शिरसाट म्हणाले की, अजित दादा हे स्पष्ट आणि खरं बोलतात. ते आघाडीमध्ये होते, तेव्हाही आम्ही त्यांच्या भूमिकेला कायम समर्थन आहे. ते स्पष्टपणे आणि खरं बोलणारे नेते आहेत. त्यांना झालेला आजार डेंग्युचा होता, त्यांना कोणताही राजकीय आजार झाला नव्हता,असं शिरसाट म्हणाले.