विजय वडेट्टीवारांचा घुमजाव; हिंगोलीतील भुजबळांच्या सभेला जाणार, म्हणाले…

विजय वडेट्टीवारांचा घुमजाव; हिंगोलीतील भुजबळांच्या सभेला जाणार, म्हणाले…

OBC Reservation : जालन्यातील ओबीसी सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजावर जहरी टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेशी आपण असहमत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. पण आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. उद्या होणाऱ्या हिंगोलीतील ओबीसी सभेला (Hingoli OBC Rally) हजेरी लावणार आहेत.

मराठा समाजाबाबतची छगन भुजबळांची वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे आपण भुजबळांच्या कार्यक्रमाला जाणार नाही असे वडेट्टीवार यांनी जाहीर केले होते. पण आता गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरुन मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, तसेच सर्व ओबीसी नेत्यांची देखील अशीच भावना आहे. त्यामुळे उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi यांचं वंचित बहुजन आघाडीच्या ‘त्या’ पत्राला उत्तर, पत्रात नेमकं काय म्हटलंय?

वडेट्टीवार म्हणाले की, हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याची आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. सगळ्या ओबीसी बांधवांनी ही तयारी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरुन मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, ओबीसी नेत्यांची सुद्धा अशीच भावना आहे. त्यामुळे आपण हिंगोलीच्या मेळाव्याला जाणार आहे. हा मेळावा सर्वपक्षीय मेळावा आहे. ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर राजीनामा देण्यासाठी तयार असल्याची भूमिका मांडली आहे. तसेच ओबीसीच्या हक्कासाठी भेद नको असं म्हणणारे नेते मला भेटले आहे. त्यामुले आमच्या भूमिकेमुळे चुकीचा संदेश जाऊ नये आणि ओबीसींच्या आग्रहाखात मी हिंगोली येथे उद्याच्या मेळाव्याला जातोय, असे वडेट्टीवार म्हणाले.

Sushama Andhare : नगरमध्ये सुषमा अंधारेंच्या फोटोला फासलं काळं, नेमकं कारण काय?

ते पुढं म्हणाले की पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांच्या आदेशाशिवाय लाठीमार होणे शक्य नव्हते. त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे. तसेच फक्त ओबीसी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व इतरांवर झाली नसल्याचा चुकीचा संदेश जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज