Download App

अजितदादा अन् पवार गट एकत्र येणार; संजय शिरसाट यांचा खळबजनक दावा

Sanjay Shirsat On NCP : पावसाळी अधिवेशनाला आजपासून (दि.17) सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सहभागी होते, यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार मात्र उपस्थित नव्हते. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार गटाचे सर्वजण शरद पवार यांना भेटून आले आहेत, याचा अर्थ समजून घ्या, असे म्हणत एक प्रकारे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा दिलजमाई होणार असल्याचे संकेत आमदार शिरसाट यांनी दिले आहेत.(sanjay shirsat Sensational claim on NCP Sharad pawar group ajit pawar shivsena shinde group)

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत टाचणी पडताच चर्चेत येणारं ‘यशंवतराव चव्हाण सेंटर’ काय आहे?

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार उपस्थित नसल्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता बॅकफूटवर नसून ते भाजपबरोबर आले आहेत. त्यांच्याकडे कोण राहिलं आहे आता असा सवालही यावेळी शिरसाट यांनी केला.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह राज्यसभेच्या 11 जागा बिनविरोध, भाजप बहूमतापासून दूरच

राष्ट्रवादीचे आमदार आता भाजप-शिवसेनेबरोबर आलेले आहेत. रविवारी अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्याचा अर्थ तुम्ही आता समजून घ्या की, आता राष्ट्रवादीकडून सरकारला कुठेही विरोध होणार नाही, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातच रविवारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मात्र अजित पवार गटाकडून या भेटीवर शरद पवार आमचे नेते आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले. मात्र या भेटीवरुन चर्चांणा उधाण आले आहे.

Tags

follow us