Santosh Bangar’s anger at the review meeting : नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी थेट पक्षातील मंत्र्यांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे. नांदेड शहरात शिंदे गटाच्या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. मात्र, या बैठकीतच आमदार संतोष बांगर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षाच्या नेतृत्वालाच धक्का दिला.
बैठकीत बोलताना बांगर म्हणाले की, काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत आहेत. कार्यकर्त्यांचे फोन देखील ते उचलत नाहीत. अशा मंत्र्यांना घरी बसवा, त्यांना घरचा रास्ता दाखवला पाहिजे. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच केल्यामुळे या विधानाला अधिक राजकीय वजन प्राप्त झाले आहे.
इराणसोबत चर्चा निष्फळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन
बांगर यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील काही मंत्र्यांच्या कामकाजाबाबत असमाधान असल्याची चर्चा यानिमित्ताने समोर आली आहे. पक्ष संघटनेत समन्वयाचा अभाव असल्याचे देखील संकेत या बैठकीतून मिळाले. दरम्यान, या वक्तव्यानंतर बैठकीमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली, तर काहींनी बांगर यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याची देखील चर्चा आहे. मात्र यावर अद्याप अधिकृतपणे कोणत्याही मंत्र्यांकडून प्रतिक्रिया आलेली नाही.
राजकीय विशैषकांच्या मते, आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर अशा प्रकारची उघड नाराजी शिवसेना शिंदे गटासाठी चिंतेची बाब ठरू शकते. पक्षातील अंतगत मतभेद वेळेत मिटवले नाही तर त्याचा परिणाम संघटनात्मक ताकदीवर होऊ शकतो. आता या संपूर्ण प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेतं, संबंधित मंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येते आणि संतोष बांगर यांच्या वक्तवव्याचे पुढे काय राजकीय परिणाम होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले
