Download App

वाल्मिक कराड अन् लक्ष्मण हाकेंचं एकत्र जेवण; अंजली दमानियांनी फोटो शेअर केला

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केलायं.

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder) सध्या चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अडकवलं जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलायं. हाके यांच्या या आरोपानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हाके आणि कराडांच्या संबंधाबाबतचा एक फोटोच बाहेर काढलायं. दमानियांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केलायं. सध्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झालीयं.

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून आहेत. भाजप आमदार सुरेश धसांविरोधात लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. वाल्मिक कराडला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. तसेच वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याची बाब हाके यांनी अधोरेखित केली. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत, असे लक्ष्मण हाके म्हणाले. त्यानंतर काही वेळातच अंजली दमानिया यांनी एक फोटो ट्वीट केला आहे.

मंत्री विखे ॲक्शन मोडमध्ये, सिंचन व्यवस्था बळकट करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांसह बीडमधील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आधी सीआयडी तर आता एसआयटीकडून करण्यात येत आहे. देशमुख हत्या प्रकरणी पहिल्या दिवसापासूनच भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आवाज उठवत आहेत. बीडमधील दहशतीचे प्रकार, खंडणी गुंडगिरीवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज बीडमध्ये संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करीत आरोप करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यानंतर आता हाके आणि वाल्मिक कराड या दोघांचा जेवतानाचा फोटो अंजली दमानियांनी समोर आणलायं.

दरम्यान, खंडणीच्या वादातून वाल्मिक कराड यांच्यासह इतरांनी संतोष देशमुख यांची अत्यंत हत्या क्रुरपणे हत्या केल्याचा आरोप अंजली दमानिया यांच्याकडून केला जात आहे. या प्रकरणी दमानिया यांना ओबीसी बांधवांकडून टार्गेट केलं जात असून दररोज 700 ते 800 धमक्या दिल्या जात असल्याचंही दमानिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दमानिया यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये ओबीसी समाजबांधवांची सभा घेत मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही बीडमधील एका आदिवासी तरुणांच्या आरोपीला शोधून काढा, बीडच्या घटनेला जातीय रंग देऊ नका, तुम्ही बीडमधील अधिकाऱ्यांची जात काढलीयं, हे गरीबांची पोरं काबाडकष्ट करुन, पोटाला चिमटा देऊन स्पर्धा परिक्षेतून अधिकारी झालेले आहेत, अशी सडकून टीका अंजली दमानियांवर हाकेंनी केली होती.

follow us