Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बँकेवर उदयनराजे पुन्हा बिनविरोध; विरोधकाने अर्ज मागे घेतला

Satara DCC Bank Election: विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे ज्ञानेश्वर पवार यांनी अर्ज मागे घेतला आहे. आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एक जागा बिनविरोध झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पुन्हा एकदा बिनविरोध बाजी मारली आहे. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे ज्ञानेश्वर पवार यांनी अर्ज मागे घेतला आहे. आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.


इंडिया आघाडीच्या मोर्चावर फडणवीसांचा पलटवार; ‘विरोधकांना संविधानिक संस्था डिस्क्रेडिट करायच्या आहेत’

उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर पवार यांनी अर्ज भरला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ज्ञानेश्वर पवार यांनी छत्रपतींच्या गादीचा सन्मान म्हणून आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा जिल्हा बँकेवरील विजय बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


सौरभ कुंडलिक यांच्या कामाची दखल थेट भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लागली वर्णी

दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड होण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. 2021 मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी याच गटातून उमेदवारी दाख केली होती. त्यावेळी विरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची पहिल्यांदा बिनविरोध निवड झाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर पवार यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांनी पहिल्याच दिवशी अर्ज मागे घेतल्याने उदयनराजेंची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या अधिकृत निवडीची घोषणा केली जाणार आहे.

Exit mobile version