Download App

Satyajeet Tambe : …अखेर आज बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये ! सत्यजित प्रकरणावर मौन सोडणार?

  • Written By: Last Updated:

विधानपरिषद निवडणुक आणि नाशिक पदवीधर निवडणुकीचा संपूर्ण ड्रामा संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये येणार आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस मौन बाळगून असलेले थोरात आज मौन सोडणार का ? याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

नागपूर अधिवेशनादरम्यान दुखापत झाल्याने बाळासाहेब थोरात हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतरही ते त्यावर काही बोलले नाहीत. ७ फेब्रुवारी हा बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस असतो. त्या निमिताने आज संगमनेर मध्ये शिंदेशाही कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याला बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान काल पत्रकार परिषद घेवून सत्यजित तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की  “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडींचा उल्लेख केला.

 

Tags

follow us