Download App

सत्यजित तांबेंसाठी महाविकास आघाडीची मोठी फिल्डींग

मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळताहेत. आता सत्यजित तांबे यांच्या सातत्यानं अडचणी वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना मातोश्रीचा अर्थात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा पाठींबा मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठींबा देण्याचा महाविकास आघाडीनं निर्णय घेतलाय.

नाशिक पदवीधर निवडणुकीत एका मागून एक ट्विस्ट समोर येताहेत. त्यातच अपक्ष उमेदवार म्हणून असलेल्या शुभांगी पाटील यांनी मुंबई गाठली असून त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्या. नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर मातोश्रीवर बैठक बोलावली होतील. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेते सुभाष देसाई व नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

काँग्रेसमधील गोधळामुळं अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सांगितलं होतं की, नाशिक पदवीधर निवडणूक ही बिनविरोध होणार नाही, कुणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल बैठक होणार असल्याचं सांगितलं होतं. आता नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठींबा मिळाल्याचं समोर आलंय. म्हणजेच शुभांगी पाटील या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून लढणार आहेत.

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचाही सत्यजित तांबेंना विरोध असल्याचं शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितलंय. त्यामुळं आता सत्यजित तांबे यांच्या अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे.

Tags

follow us