मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं युवा नेते सत्यजीत तांबे यांना काँग्रेसनं (Congress) चांगलाच दणका दिला होता. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पक्षानं तांबे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दरम्यान, आता आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe यांनी यावर भाष्य केलं. आमच्या कुटुंबाने काँग्रेससाठी 100 वर्षे दिली. मात्र, पक्षाने मला स्पष्टीकरणाची एकही संधी न देता निलंबित केलं. हा माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला? असे विचारत त्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली.
पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि ते निवडणूक जिंकलेही आहेत. माझ्यासोबत काय घडलं ती खूप मोठी गोष्ट आहे. ती मी नंतर कधीतरी सांगेन. मला अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागली, कारण माझ्यापुढे काही पर्यायच उरला नाही, असं सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
ते म्हणाले, माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला? याचे उत्तर पक्षातले वरिष्ठ नेतेच देऊ शकतील. याचं उत्तर माझ्याकडे नाही. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडले ते दुर्दैवी होते. मला अपेक्षा होती की, काँग्रेसकडून मला तिकीट मिळेल. पण तसे घडले नाही. त्यामुळे अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि मी जिंकूनही आलो. माझ्या कुटुंबाने काँग्रेस पक्षासाठी 100 वर्षे दिली. मात्र त्याच पक्षाने मला स्पष्टिकरणाची एकही संधी न देता थेट निलंबनाची कारवाई केली.
ते म्हणाले, दरम्यान, ज्या काही कॉंग्रेसमध्ये घडामोडी घडल्या त्यामुळे आमच्या कुटुंबात दुफळी तयार झाली आहे, अशा काही बातम्याही पसरवल्या गेल्या. खास करून बाळासाहेब थोरात नाराज आहेत, ते वेगळा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत. मात्र, आमच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारची दुफळी तयार झालेली नाही. आम्ही कालही एकसंध होतो आणि आजही आहोत, असेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
राहुल कुल यांच्यावर जबाबदारी; ऑपरेशन संजय राऊत पार पडणार
तसेच महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी आमच्याशी चर्चा झाली होती. माझे नावच काँग्रेसचा उमेदवार म्हणून येणार होते. शेवटच्या क्षणी ते जाहीर करायचे हे ठरले होते. मात्र अर्ज करायच्या दिवशी माझ्या वडिलांचे नाव दिल्लीतून जाहीर झाले. माझ्याशी बोलणे झाले होते त्याप्रमाणे पाटील यांनी मला उदेवारी देण्यात यावी, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मलाही अपेक्षा होती की काँग्रेसकडून मला तिकिट मिळेल. पण तसं घडलं नाही. त्यामुळे मी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यांतर मला थेट निलंबनाचं पत्र पाठवण्यात आलं. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने मला बोलण्याची, स्पष्टीकरण देण्याची संधी दिली गेली नाही, ही नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.