Download App

Satyajit Tambe यांचा नवा घरोबा? तांबे घेणार फडणवीसांची भेट

नवी दिल्ली : नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency)अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे विजयी झाल्यानंतर तांबे यांनी अपक्षच राहणार असल्याचं त्यांनी घोषणा केलीय. तसंही ते अपक्षच निवडून आले आहेत, त्यांनी वेळ मागितलीय, ते भेटायला आल्यावर आम्ही बोलू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी सत्यजित तांबे यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलंय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती, पण भाजपच्या कार्यकर्त्यांसह पक्षश्रेष्ठी तांबेंच्या भाजप प्रवेशाचं स्वागतच करताहेत. मात्र आतापर्यंत तरी सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष निवडून आलो आहे तर पुढेही अपक्षच म्हणून राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळं काही काळासाठी तरी तांबेंच्या भाजप प्रवेशावरील चर्चांना पूर्णविराम देण्यात आलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तांबेंनी घोषणा केली आहे की, ते अपक्ष राहणार आहेत, तसेही ते अपक्ष निवडून आले आहेत. हे निश्चित आहे की, लोकल लेवलवर आमचा उमेदवार नसल्यामुळं आमच्या लोकांनी निश्चित त्यांना मदत केली असणार आहे. कारण आम्ही लोकल लोकांवरच सोडलं होतं, आम्ही पार्टी म्हणून कुठलीही घोषणा केली नव्हती.

आजतरी सत्यजित तांबे आमच्या पक्षात येणार न येणार, याबद्दल मी काही बोलणार नाही असंही ते म्हणाले. आता तांबे यांनी जी काही घोषणा केली आहे त्या घोषणेच्या अनुरुप त्यावर लक्ष ठेवून आहोत. ते मला भेटायला येणारचं आहेत, ते भेटायला आल्यानंतर आम्ही बोलू असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय

Tags

follow us